Sanjay Raut On  Radhakrishna Vikhe Patil : आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहेत. शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने हे वक्तव्य केले आहे. तर त्यांच्या याच वक्तव्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान अशीच काही प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रेम एकावर अन् नांदायचं दुसऱ्यासोबत, विखेंना मंगळसूत्र बदलण्याची सवय असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. 


सद्या राज्यात मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य भाजप नेते विखे पाटील यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले आहे की, "देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री असं विखे म्हणाले. मग मनातील वेगळे आणि तनातील वेगळे आहेत का?, जे मुख्यमंत्री तुम्हाला नको हवे आहेत त्यांच्या हाताखाली तुम्ही का काम करत आहात? मान्य नसेल तर जबरदस्तीने काम करु नका, याला बलात्कार म्हणतात. याला मनात नसताना नांदायचं म्हणतात. म्हणजेच प्रेम एकावर अन् नांदायचं दुसऱ्यासोबत हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. ते आधी आमच्याकडे शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये होते आणि आता भाजपमध्ये आहेत. विखेंना मंगळसूत्र बदलण्याची सवयच असल्याचं संजय राऊत म्हणाले. 


राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया...


राज्यात असलेलं सरकार आगामी 15 दिवसांत कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले असल्याचं राऊत म्हणाले आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर यावरच अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारावर केलं मला माहित नाही. त्यांची माझी शेवटची भेट नागपूरच्या सभेवेळी झाली होती. आम्ही सोबत जेवलो होते. पण तेव्हापासून आमची भेट झाली नाही, तसेच फोनवर देखील चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याने असे वक्तव्य कसे केले याबाबत मला माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच; भाजप मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापणार?