Radhakrishna Vikhe Patil On Maharashtra CM : गेल्यावर्षी जुलै महिन्यात पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी,"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य केले होते. तर रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता त्यानंतर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील असंच काही वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत. शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने हे वक्तव्य केले आहे.


काय म्हणाले विखे पाटील? 


अजित पवारांच्या मनात काय? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार हे संपूर्ण राज्याला संभ्रमात टाकले आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवारांना देखील संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. तर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, 'हे स्पष्ट असून, देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचं विखे पाटील म्हणाले. 


राजकीय वातावरण तापणार? 


विखे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी,"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं," असं वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर देखील अनेकदा फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असल्याचं भाजप नेत्यांकडून दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यातच आता, 'आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच असल्याचं' वक्तव्य विखे पाटील यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया काय असणार हे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Uddhav Thackeray Rally: उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यात सभा; शिंदे गटाकडून सभा उधळण्याचा इशारा