Uddhav Thackeray  in Jalgaon : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. यापूर्वी खेड, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे याच सभांमधून त्यांनी शिंदे गटासह भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आज होणाऱ्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. 


उद्धव ठाकरेंची तिसरी मोठी सभा आज जळगावच्या पाचोऱ्यात होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल झाले होते. तर राऊत यांच्यासह ठाकरे गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या या सभेमुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. त्यामुळे आजच्या या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर 'बाण' सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले


जळगावात होणाऱ्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आहे आहेत. तर आज होणारी उद्धव ठाकरेंची सभा उधळून देण्याचा थेट इशाराच शिंदे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आज जळगावमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर झालेली टीका अजिबात सहन करणार नसून, आज होणारी उद्धव ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होत आहे. दरम्यान या सभेपूर्वीच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा शिंदे गटाकडून दिला गेला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस अलर्ट झाली आहे. सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच शिंदे गटाच्या पदाधिकारी यांच्यावर देखील पोलिसांची नजर असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत, म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी आणि उद्धव ठाकरे यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalgaon Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून, राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला