Abdul Sattar On Chandrakant Khaire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादच्या (Aurangabad) सातारा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान खैरे यांच्यावर रितसर कारवाई करुन त्यांना अटक सुद्धा करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. तर अशा गुन्ह्याला मी घाबरत नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत खैरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खैरे यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. याबाबतच बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, "प्रत्येक व्यक्तीने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा आदर राखला पाहिजे. शासकीय नियमानुसार खैरे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्यच आहे. तसेच कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत." "त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर नियमाप्रमाणे खैरे यांना अटक सुद्धा झाली पाहिजे," असेही सत्तार म्हणाले.
खैरेंचं प्रत्युत्तर...
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून पाप केलं आहे. हा संताप फक्त महाराष्ट्रातील नव्हेतर देशभरातील शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसैनिक चिडलेले असून, या चिडीमध्ये मी काही बोललो असेल तर काय बोललो? आपण आंदोलनात सुद्धा सहज म्हणतो 'याच करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय'...त्याप्रमाणे मी म्हणालो होतो. मला अटकेची भीती वाटत नाही. मी घाबरत नाही काय होईल ते पाहूत, हिंदुत्वासाठी जेलमध्ये जाणारा मराठवाड्यातील मी पहिला शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या आनंद दिघेंच्या चित्रपटात खुद गद्दारांना शिक्षा दिल्याचं दाखवलं आहे. त्याप्रमाणे मी म्हणालो होतो," असं खैरे म्हणाले.
Abdul Sattar On Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांना अटक झालीच पाहिजे : सत्तार
खैरे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनेकदा बोके, चोर, रिक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित करुन त्यांचे चारित्र्यहनन आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला खैरे यांच्याकडून केला जात असल्याची तक्रार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसात दिली होती. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवण्याच्या दृष्टीने सोशल मीडियाच्या विविध माध्यमावर असंवैधानिक भाषेचा वापर करणे, तसेच दंगल घडवण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावणे, दंगल घडवण्याचे उद्देशाने नेहमी वक्तव्य करणे आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा उल्लेख सुद्धा या तक्रारीत करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या