मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले असले तरी  इतर मुद्यावरुन अजित पवार गटात नाराजीचा सूर पाहायला  मिळत आहे.  महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना डावललं जात असल्याने नाराजीचा सूर आहे. तर राष्ट्रवादीसाठी सर्वात जास्त त्याग हा भाजपलाच करावा लागत असल्याची भावना भाजपच्या मंत्र्यांमध्ये आहे. 


आपल्याला जे पाहिजे ते पदरात पाडून घ्यायचा हातखंडा अजित पवारांचा असल्याचा नेहमीच पाहायला मिळतो. अजित पवार त्यासाठी ते कधी नाराज होतात तर कधी खुश होतात. दादा नाराज झाले आणि पुण्याच पालकमंत्री पद पदरात पाडून घेतलं. पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल असलं तरी अजित पवार गटामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतय. त्याला फक्त पालकमंत्री पदांच वाटपच नाही तर अनेक निर्णयात डावलं जात असल्याची या  मंत्र्यांची भावना आहे. 


कोणत्या घटनांमुळे अजित पवार गट नाराज? 



  • सरकारमध्ये डावललं जात असल्याची मंत्र्यांची भावना- राज्यात महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांचा गट सहभागी झाला. मात्र निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेना आणि भाजपचेच मंत्री पाहायला मिळतात.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना डावललं जात असल्याची भावना या मंत्र्यांची आहे.

  • लोकसभा आढावा बैठकीपासून राष्ट्रवादी लांब - रविवारी मुंबईत गरवारे क्लबमधये लोकसभा आढावा बैठक झाली. मात्र या बैठकीला फक्त भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. अजित पवार गटाला य संदर्भात कोणतीही माहिती ने देता लांब ठेवण्यात आलं

  •  पालकमंत्री पदांच्या वाटपावरून नाराजी- अजित पवार यांना पुण्याच पालकमंत्री पद देण्यात आलं. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदिती तटकरे यांना रायगड किंवा रत्नागिरी पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र ते न देता उदय सामंत याच्याकडे दोन पालकमंत्री पद ठेवण्यात आली. छगन भुजबळ हे अजित पवार गटांमध्ये वरिष्ठ मंत्री आहेत त्यांनी नाशिकचे पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र त्यांना न देता शिंदे गटाचे दादाजी भुसेंकडे कायम ठेवण्यात आल आहे. पालकमंत्री पद देताना भाजपने त्याग करत आपल्या वाट्याला आलेली  पालकमंत्री पद दिली. मात्र शिंदे गटाने महत्वाची पालकमंत्री पद आपल्याकडे कायम ठेवली आहे

  • अजित पवार गटाच्या महत्वाच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्या -अजित पवार गटांतील मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या काही फाईल्स या मुख्यमंत्री कार्यालयात आडवून ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री नाराज आहेत

  •  निवासस्थान वाटपावरून नाराजी : मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे मंत्री वरिष्ठ आणि अनुभवी असताना त्यांना निवासस्थानांच वाटप नवीन मंत्र्यांना देण्यात येणारी निवासस्थान दिलेली आहेत. तर मुख्यमंत्री यांच्याकडे चार निवासस्थान असल्याने नाराजी आहे.  याच नाराजीमुळे अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही अशी चर्चा आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासारखे गंभीर प्रश्न असताना अजित पवार मात्र यात फार सक्रिय दिसले नसल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींना समोर जावं लागलं


जशी अजित पवार गटामध्ये नाराजी आहे. तशीच काही प्रमाणात नाराजी ही भाजपच्या मंत्र्यांमध्ये पाहायला मिळते. कारण राष्ट्रवादीसाठी सर्वात जास्त त्याग भाजप करताना पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना त्याग करावा लागला. या उलट मात्र शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहताना पाहायला मिळत आहे. हीच भाजपची नाराजी मोहित कंबोज यांच्या ट्विट आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाषणातून पाहायला मिळाली.


 महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांकडून अडवणूक केली जात असल्याच आरोप शिंदे गटाच्या मंत्र्यांनी वारंवार केलेले होते. आता मात्र मुख्यमंत्र्यांकडून आडवणूक होत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे मंत्री खासगीत बोलताना करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे आणि पवार गटाला सोबत घेऊन जाण हे भाजपसाठी मोठी कसरत असणार आहे. 


हे ही वाचा :