नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे, भाजप (BJP) हा मोठा भाऊ आहे. त्यामुळं मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागत आहेत. यासाठीच की शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीला (NCP) यांना सत्तेपासून दूर ठेवायचं. महाराष्ट्रात (Maharashtra) अनागोंदी माजली तरी चालेल. राज्यात रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू आहे. हे सुरू असताना हे सगळे रुसव्या फुगव्यात आणि खातेवाटपात अडकले आहेत. हे राज्याचं दुर्दैव आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिला नाही. फक्त  मविआच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोपी तुमच्या शेजारी बसला आहे. भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवला होता, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. 


... तर अजित पवारांची आमदारकी जाईल (Sanjay Raut on Ajit Pawar)


फडणवीस तुम्ही तुमचं मातेरं करून घेतलं आहे. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत.  जर विधानसभा अध्यक्ष कायद्याने वागले तर एकनाथ शिंदे हे पाच वर्ष नव्हे तर पाच मिनिटेही मुख्यमंत्री राहणार नाहीत. इतकंच नाही तर अजित पवार यांचीही आमदारकी जाईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. 


राहुल नार्वेकर बेकायदेशीर अध्यक्ष (Sanjay Raut on Rahul Narwekar)


यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर तुफान हल्ला चढवला. इतके बेकायदेशीर अध्यक्ष देशाच्या इतिहासात झाले नाहीत. त्यांनी कायद्याची भाषा करणं म्हणजे कायद्याचा अपमान आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 


आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेचा निषेध (Sanjay Raut on Sanjay Singh AAP)


या देशात एकतर्फी कारवाया सुरू आहेत. आप खासदार संजय सिंह (Sanjay Singh AAP) यांच्या अटकेचा निषेध करतो.  आणीबाणीच्या काळात विरोधीपक्ष आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं होतं तसं हे सरकार INDIA आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात टाकणार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 


शरद पवार खरं बोलले (Sanjay Raut on Sharad Pawar)


शिवसेनेतून जे लोक शिंदे गटात गेलेत त्यांच्यातील 10 लोकांना तर ED चे समन्स आलं होतं. ED चा धाक आणि भीतीने ते तिकडे गेले हे सगळ्यांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.   


VIDEO : Sanjay Raut on Ajit Pawar : संजय राऊत नेमकं काय म्हणाले?



संबंधित बातम्या


मुंबई, बारामती ते वर्धा; कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेतील जागा वाटपासाठी मविआकडून नऊ जणांची समिती