नवी दिल्ली :  राष्ट्रवादी फुटीसंदर्भात (NCP Crisis)  6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात (Election Commission)  सुनावणी घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगात उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 


शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार आहे.  शरद पवार गटाकडून या सगळ्या संदर्भात तयारी करण्यात आली आहे. आज शरद पवार गटाकडनं दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये  कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार?  पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे  हाच या बैठकीचा  अजेंडा हा असणार आहे. 


अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाच्या शपथपत्रांची संख्या अधिक 


दरम्यान  शरद पवार गटाकडून जवळपास आठ ते नऊ हजार कागदपत्र म्हणजे शपथपत्र दाखल करण्यात आली हे. शरद पवार गटाचा  दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा कागदपत्रांची संख्या ती जास्त आहे.  अजित पवार गटाकडून जी कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत. अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही दोष सुद्धा ते निवडणूक आयोगाला दाखवणार आहेत . अजित पवार गटाच्या कागदपत्रांमध्ये काही मृत व्यक्तींच्या नावे ही शपथपत्र दाखल केली गेली आहेत. काही शिक्षण संस्थांचे कर्मचारी आहेत की जे सरकारी नोकरीला आहेत त्यांचे सुद्धा शपथपत्र दाखल करण्यात आल्यचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. 


नेत्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही


उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.  अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाचे नेते असणार आहे. स्वत: नेत्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. मुख्य नेते उपस्थित नसले तरी दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.उद्यापासून निवडणूक आयोगात सुरू होणाऱ्या लढाईत पहिला निर्णय काय असणार  हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


हे ही वाचा :


Sanjay Raut on Ajit Pawar : ..तर अजित पवार यांची आमदारकी जाणार, संजय राऊत यांचा मोठा दावा