Mahebub Shaikh On Raj Thackeray : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे भोंगेवाले बाबा जशी ईडीची नोटीस आली, तसं लाव रे तो भोंगा म्हणायला लागले, असल्याची टीका मेहबूब शेख यांनी केली आहे. पुण्याचा पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शेख यांनी ही टीका केली आहे. 


दरम्यान यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, आता एक नवीन बाबा आले असून, भोंगेवाले बाबा..या भोंग्या वाल्या बाबाचा पक्ष 2005 मधील पक्ष आहे. तर 2005 पासून या भोंग्यावाल्या बाबाला कधीच भोंग्याचा त्रास झाला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे भोंगेवाले बाबा जशी ईडीची नोटीस आली, तसं लाव रे तो भोंगा म्हणायला लागले. दहा महिन्यापूर्वी मी आणि सुप्रिया सुळे शिर्डीत दर्शनासाठी गेलो असताना, मंदिर प्रशासनाने माझी भेट घेतली. आणि मला सांगितले की, राज ठाकरेंच्या भुमिकेमुळे शिर्डीच्या मंदिरातील पहाटेची चार वाजेची काकड आरती बंद झाली. तर ही काकड आरती बंद झाल्याने मंदिर परिसरातील भाविकांना जे प्रसन्न वाटायचं ते बंद झालं. त्यानंतर शिर्डीच्या मुस्लीम बांधवानी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले की, आमची सकाळची आजन बंद झाली तरीही चालेल पण शिर्डीची सकाळची काकड आरती सुरु राहिली पाहिजे. 


एमआयएमवाले काय तुमचे जावई आहेत का?


पुढे बोलताना शेख म्हणाले की, अमित शहा आपल्या भाषणात सांगतात, मी नवाब मलिक यांना जेलमध्ये घातलं. मी युपीच्या आजम खानला जेलमध्ये टाकलं. त्यामुळे अमित शहा यांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही नवाब मलिक यांना मुस्लीम आहे म्हणून जलेमध्ये टाकलं म्हणतात, आजम खान यांना मुस्लीम आहे म्हणून जेलमध्ये टाकलं म्हणतात, मग एमआयएमवाले काय तुमचे जावाई आहेत का? असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला. 


पवारांसमोरच मोदींची नक्कल... 


दरम्यान भाषण सुरु असताना मेहबूब शेख यांनी शरद पवारांसमोरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल काढली. "भाई और बहनों, 2014  मी भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है,और मै देश का पंतप्रधान बनता हु, तो विदेश मी जाऊंगा काला धन लाउंगा, और सबके खाते में 15 लाख डाल दुंगा,” अशी नक्कल शेख यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? राज ठाकरेंनी फटकारलं