मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. तसेच शरद पवारांच्या वयावरुनही अजित पवारांनी निशाणा साधलाय. अजित पवार आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया

  


अजित पवारांचे भाषण (Ajit Pawar Speech) 


राष्ट्रवादीवर ही वेळ का आली? आपण सगळ्यांनी इतक्या दिवस मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. घडलेलो आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, आपल्या सर्वांचे तेच मत आहे. पण, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एकंदरीतच आज काय राज्य पातळीवर राजकारण चाललंय. शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरता स्थापन करतो. लोकांची विकासाची कामी होण्याकरता. सर्व जाती-धर्माला न्याय देण्यासाठी काम पक्ष करतो. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न होतं. ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे याकरता आपण काम करत असतो.


आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 ला केली. विद्यार्थी असताना 1972 ला राज्यमंत्री झाले, 1975 ला मंत्री झाले. पण, 1978 ला अशाच पद्धतीने एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार बाजूला करून 1978 ला पुलोद स्थापन केला. त्यावेळेस साहेब 38 वर्षाचे होते. त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे. 1978 चा काळ गेला 1980 ला पुन्हा मध्ये जनसंघमध्ये  सामील झालो जो आता भाजपा आहे. उत्तमराव पाटील मंत्रीमंडळामध्ये होते. इतरही शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. गणपतराव देशमुख होते. सगळेजण तुम्ही काँग्रेसमध्ये आलात. सरकार गेलं निवडणुका झाल्या. आणीबाणीनंतर 77 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. 77 ला देश पातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठे आहे का? करिश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्याच्या नंतरच्या काळामध्ये 80 चा उल्लेख केला. 85 ला पुन्हा त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष साहेबांनी काढले. आपण सगळ्यांनी साथ दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85 ला काय पुन्हा आपण विरोधी पक्षांमध्ये गेलो. मित्रांनो प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलेचा प्रत्येक तरुणाचा वडीलधाऱ्यांचा काळ असतो.  आपण साधारण वयाच्या 25 पासून साधारण 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो. समाजाकरता काही तरी करून दाखवण्याची जिद्द असते अशा पद्धतीने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतच असं नाही. परंतु, हे सगळं घडत असताना काय झालं मला माहीत नाही.


मी कधीही पक्षात भेदभाव केला नाही


मला 2004 साली एवढं मोठ महत्त्वाच स्थान नव्हते. आम्ही कुणी कामात कमी आहोत का? कोणाचा आदर करायला कमी आहोत का? जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि मी तसचं काम करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. सकाळी पहाटे कामाला सुरुवात करतो हे कशाकरता? महाराष्ट्र पुढे जावा. महाराष्ट्र देशभरात सर्वच पातळीत पहिल्या तुमच्या सर्वांच्या सहका-याने आपल्या पुढे जायचं आहे. मला मानापासून वाटत होतं की आपला पक्ष वाढला पाहिजे . भाजपने 2014 ला सांगितलं होतं की राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजपने 16-16-16 जाग्या लढवाव्यात.   नितीन गडकरींची इच्छा होती मात्र तस होऊ शकलं नाही. सरकारमध्ये आल्यानंतर आपल्याला मंत्री पादाची खाती मिळणार महामंडळाची खाती मिळतील पालकमंत्री पद मिळेल. मी कधीही पक्षात भेदभाव केला नाही. 


देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या 


2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणविसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं. जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं तर का तिथे आम्हाला पाठवलं. 2017 ला देखील असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते.भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या.मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, बाहेर काहीच बोलायचं नाही. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेचे आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावी. मी एकही शब्द खोटं बोलत असेल तर पवारांची औलाद म्हणून नाव लावणार नाही.त्यांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा पहिले दिला आणि नंतर मागे घेतला तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली ते हट्टी आहेत, ऐकणार नाही. 


माणसानं कधीतरी थांबावं..


शरद पवार आजही माझे आदर्श आहेत, मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं..तरूणांना संधी कधी देणार..चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा...मार्गदर्शन करा. 2014 साली मोदींच्या चेहऱ्यावर भाजपनं केंद्रात सत्ता आणली.त्यानंतर 2019 साली ही मोदींनी एकहाती सत्ता आणली. 2024 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याचे शरद पवार म्हटल्याची माहिती अजित पवारांनी दिली. 


माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही


आम्हीही पक्ष बांधला...आम्हालाही लोक ऐकतात..आम्हीही नेते आहोत... जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल..एका आमदाराला त्यांनी म्हटलं मला आमदार व्हायचं नाही तर ते म्हणाले की पाहतोच तू जिंकून कसा येतो...असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का...परिवार आहे तो आपला. आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये..माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही. पवारांनी स्वतः आम्हाला सांगितलं की 2024 साली नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही..आपण विधानसभेच्या 90 जागा लढवणार..लोकसभेच्याही जास्त जागा लढवणार आहोत.