Mahavikas Aghadi Live Updates : मविआच्या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब! 21-17-10 जागावाटपाचा फॉर्म्युला

Mahavikas Aghadi PC Live Updates : आज महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. या संदर्भाती प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2024 02:59 PM
सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब 

सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब 


सातारा लोकसभेसाठी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शशिकांत शिंदे रिंगणात 


सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास प्रकृती कारणास्तव नकार दिल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब 


शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून थोडयाच वेळात करण्यात येणार

ABP माझा हेडलाईन्स | 09 एप्रिल 2024 | मंगळवार

महाविकास आघाडीचा सर्व 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर, सांगलीची जागा ठाकरेंनाच, कुणाची कुठे तडजोड?*
https://tinyurl.com/kwpatr7m 


महाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर, कोण कुठल्या जागेवर लढणार?
https://tinyurl.com/mv7msmph 


48 जागा, 48 उमेदवार; मविआ उमेदवारांची संपूर्ण यादी
https://tinyurl.com/2s38yjx 


महाविकास आघाडीमधील सांगली, भिवंडी आणि मुंबईचा तिढा सुटला; कुणाकडे कोणता मतदारसंघ?
https://tinyurl.com/3vjju2x9 


सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला; मविआच्या बैठकीत घोषणा, काँग्रेसने काय म्हटले?
https://tinyurl.com/yv6r7889 


जागावाटपाचा तिढा संपुष्टात, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील, नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
https://tinyurl.com/4mecbysa 


बारामती, शिरुर, मावळ अन् पुण्यात मविआचं ठरलं; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
https://tinyurl.com/248c8pfj 

उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

महाविकास आघाडी व्यापक होईल यासाठी प्रयत्न आम्ही केले. प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या. 
आता ते काही जरी बोलले तरी आम्ही काही बोलणार नाही. आम्हाला अजूनही आदर त्यांच्याबद्दल आहे.  


काल तीन गोष्टीचा एकत्रित योग होता. अमावस्या होती, ग्रहण होत आणि यांची सभा होती. काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचं नव्हतं , ते भेकडं जनता पक्षाचे नेते मोदी यांचा होतं. यांच्यामध्ये ताकद नाही म्हणून भेकडं म्हणतोय.


भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा असा भाजप पक्ष झाला आहे. जेव्हा शिवसेना निर्माण झाली,तेंव्हा ते मोदी हिमालयात असतील. 
यांचा भाजप पक्ष खंडणीखोर आहे. चंदा दो धंदा लो असा यांचं काम आहे. खंडणीखोर नेत्यांनी असा सेनेला हिनवणे बरोबर नाही


 


 

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीकडून अंतिम जागावाटप जाहीर

Mahavikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीकडून अंतिम जागावाटप जाहीर


काँग्रेस - 17


नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, नांदेड,जालना, मुंबई-उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई-उत्तर


राष्ट्रवादी -  10


बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड


शिवसेना -  21


जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे,रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी,सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. तानाशाही विरोधात आम्ही एकत्र आलोय. मोठे मन करून आम्ही जागा वाटप अंतिम केला आहे.  मुस्लिम लीगने या देशाला तोडलं म्हणाले, मुस्लिम लीग चा उल्लेख करण्याचा उद्देश काय? मत एकमेकांना नक्की जाणार. पंतप्रधान म्हणतात ही सेना नकली आहे?? तिन्ही कार्यकर्ते एकत्रित येऊन उमेदवार निवडून आणतील. काल चंद्रपूरला पैसे देऊन लोक आणले. रटाळ भाषण काल मोदी यांचं झालं. 

शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा 

शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा 


राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा 

बारामती 
शिरूर 
सातारा 
भिवंडी 
दिंडोरी 
माढारावेर 
वर्धा 
अहमदनगर दक्षिण 
बीड

काँग्रेसला १७ जागा, संजय राऊत यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला वाचून दाखवला!

जागा वाटपाची यादी जाहीर करण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर होती. मात्र नाना पटोले यांनी जाहीर करण्यास नकार दिला. त्यामुळे संजय राऊत यांनीच  ही यादी जाहीर केली


 
काँग्रेसला १७ जागा 


नंदुरबार 
धुळे 
अकोला 
अमरावती 
नागपूर 
भंडारा गोंदिया 
गडचिरोली चिमूर 
चांदपूर 
नांदेड 
जालना 
उत्तर मध्य मुंबई 
पुणे 
लातूर 
सोलापूर 
कोल्हापूर 
उत्तर मुंबई 
रामटेक

Sanjay Raut on Nana Patole : संजय राऊतांच्या मिश्किल टिप्पणीने नाना पटोलेंच्या चेहऱ्यावर हसू

MVA PC : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना म्हटलं की, आजच्या गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजचं वातावरण प्रसन्न आहे. नाना पटोले मान हलवताय, असं राऊतांनी म्हटलं यानंतर नाना पटोलेंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पुढे राऊत म्हणाले की, काँग्रेस नेत्यांचे आनंदी चेहरे पाहताय, पवार साहेबांचा प्रसन्न चेहरा बघतोय. शिवालयाच्या या वास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो, असं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.

Mahavikas Aghadi Live Updates : मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात

Mahavikas Aghadi Live Updates : मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.

MVA Seat Sharing : मविआचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होणार

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर केला जाणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. 

Sanjay Raut : आम्ही 35 पेक्षा जास्त जिंकू - संजय राऊत

काही लोकांचे 45 प्लस मिशन आहे, आम्ही 35 पेक्षा जास्त जिंकू, असं राऊत म्हणाले आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी आज एक मुहूर्त आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात साडे तीन शहाणे आपल्याला दिसत आहेत त्या साडेतीन शहाण्याला आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त आम्ही निवडला आहे, असं राऊतांनी सांगितलंय.

Sanjay Raut : मविआची एकजूट कायम राहील - संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही महाविकास आघाडी एकजुटीचा प्रदर्शन करेल. आज शिवालयमध्ये 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सर्व उपस्थित राहतील. समाजवादी पार्टी, डावे पक्ष तिथे उपस्थित राहतील. ही एकजूट महाराष्ट्रात कायम राहील आणि आम्ही 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू आणि हे जाहीर करायला आजच्य शुभ देणे जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Congress Meeting : पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक

मुंबई : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक


थोड्याच वेळात होणार बैठक


बैठकीला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज बंटी पाटील, विश्वजीत कदम हे नेते उपस्थित राहणार


बैठकीत सांगली आणि भिवंडी बाबत रात्री दिल्ली पक्ष श्रेष्ठी ने दिलेल्या निर्णयावर चर्चा होणार

Maha Vikas Aghadi PC Live Update : आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद

महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचं भिजत घोंगडं काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference Of Maha Vikas Aghadi) असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. 

Mahavikas Aghadi Seat Sharing Live Updates : सांगलीच्या जागेववरुन वाद

MVA Seat Sharing : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद चांगलाच पेटल्याचं दिसत आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. 

MVA Live Updates : सांगली, भिंवडीच्या जागेचा तिढा सुटणार?

Mahavikas Aghadi Live Updates : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये आज सांगली, भिंवडीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Maha Vikas Aghadi Live Updates : महाविकास आघाडीची 11 वाजता पत्रकार परिषद

Mahavikas Aghadi Live Updates : महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, आज महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मविआमध्ये सांगली, भिंवडी आणि मुंबईच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.