Maharashtra Cabinet Minister List 2024: कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपर्यंत...फडणवीसांची नवी टीम; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Minister List 2024: भाजपचे 19, शिवसेना शिंदे गटाकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Minister List 2024: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet) काल (15 डिसेंबर) नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. भाजपचे 19, शिवसेना शिंदे गटाकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात 42 मंत्री झाले आहेत. तर सध्या एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पाहा संपूर्ण यादी....(Mahayuti Cabinet Minister Full List 2024)
मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री-
कॅबिनेटमंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखेपाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावळ
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्ता भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंह भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ
2. आशिष जयस्वाल
3. पंकज भोयर
4. मेघना बोर्डीकर साकोरे
5. इंद्रनील नाईक
6. योगेश कदम
मंत्रिमंडळ सर्व समावेशक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तिघांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे की परफॉर्मन्स ऑडिट केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ज्यांना मंत्री म्हणून घेतले नाही, त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल. भाजपमध्ये ज्यांना मंत्री केलं जात नाही, तेव्हा त्यांना पक्षाकडून काही वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात.. मात्र जे मंत्री आज ड्रॉप झाले आहे त्याच्यामध्ये काही लोक परफॉर्मन्स न केल्यामुळे ड्रॉप झाले असतील असेही होऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. खातेवाटप संदर्भात आमच्यात चर्चा झाली आहे त्या संदर्भात स्पष्टता आहे पुढील दोन-तीन दिवसात खाते वाटप होईल.पालकमंत्र्यांसंदर्भात अद्याप आमची चर्चा झालेली नाही. अजून तो आमच्यासमोर विषय नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. मंत्रिमंडळ सर्व समावेशक आहे. सर्व समाजाला त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला मंत्रींना आधीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.