Madhuri Misal: नगरसेविका, चौथ्यांदा आमदार ते मंत्री... माधुरी मिसाळ यांची राज्य मंत्रीपदी वर्णी; आज घेतली शपथ
Maharashtra Cabinet Expansion : भाजपने यावेळी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये महिलांना देखील समाविष्ट करून घेतलं आहे. दरम्यान चार वेळी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे.
पुणे : महायुतीचा मंत्रीमंडळामध्ये लाडक्या बहिणींना देखील संधी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळ मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) पुण्यातील माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकीटासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. पुन्हा एकदा माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. चौथ्यांदा मिळालेल्या विजयानंतर आता त्यांना मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.(Maharashtra Cabinet Expansion)
गेल्या वीस वर्षांपासून मिसाळ पुण्यात काम करत आहेत. नगरसेविका ते आमदार आता मंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम करणार आहेत. उच्चशिक्षित असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यासाठी माधुरी मिसाळ यांचं मोलाचं योगदान आहे. कसबा मतदारसंघातून 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळालं. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. 2009 ते 2024 अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आमदारकी मिळवली आहे.(Maharashtra Cabinet Expansion)
माधुरी सतीश मिसाळ यांचा परिचय
भाजप उमेदवार पर्वती मतदारसंघ
शिक्षण - बीकॉम
2007 पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलं आहे.
2009, 2014, 2019, 2024 पर्वती मतदारसंघातून सलग चारदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
सध्याच्या विधानसभेत प्रतोद अशी जबाबदारी देण्यात आली.
भाजपा, पुणे शहर माजी अध्यक्षा आहेत.
लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती या समितीच्या सदस्या आहेत.
पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता येण्यात महत्त्वाचा वाटा आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून 22 नगरसेवक निवडून आणले आहेत.
विद्या सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आहेत
उद्यम सहकारी बँक संचालिका आहेत.
सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान अध्यक्षा आहेत
माजी स्थायी समिती अध्यक्ष सतीश मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ पत्नी आहेत
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांच्या नात आहेत
महत्त्वाची विकासकामे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा
पुणे मेट्रो, स्वारगेट मल्टी मोडेल हब, सिंहगड रस्ता उड्डाणपूल, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम, पर्वती देवस्थान विविध विकासकामे, तळजाई वन आराखडा, बिबवेवाडी येथे ईएसआयसी 500 बेडचे रुग्णालय