मोठी बातमी: नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, अदिती तटकरे...; राष्ट्रवादीकडून 'या' आमदारांना मंत्रिपदासाठी फोन
Maharashtra Cabinet expansion: गेल्या मंत्रीमंडळामध्ये समाविष्ट असलेल्या काही आमदारांना पुन्हा तीच मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंत्रीपदासाठी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आमदारांसह राज्याचं लक्ष महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे (Maharashtra Cabinet expansion) लागला होतं. त्यानंतर आता राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Maharashtra Cabinet expansion) आज (रविवारी) पार पडणार आहे. नागपुरमधील राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यासाठी त्यांचे नागपूर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. अद्याप कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.(Maharashtra Cabinet expansion)
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला मुख्यमंत्र्यांसह 21, शिवसेनेला उपमुख्यमंत्र्यांसह 12 आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्रिपदे मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह कमाल 43 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. आज (रविवारी) होणार्या विस्तारात सर्वच जागा न भरता काही मंत्रिपदे (Maharashtra Cabinet expansion) रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीतील संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित नेत्यांना . महायुतीतील तिन्ही पक्षांतील संभाव्य मंत्र्यांची नावे चर्चेत आली असून, यापैकी बहुसंख्य नावे निश्चित मानली जात आहेत. दरम्यान गेल्या मंत्रीमंडळामध्ये समाविष्ट असलेल्या काही आमदारांना पुन्हा तीच मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंत्रीपदासाठी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.(Maharashtra Cabinet expansion)
राष्ट्रवादीच्या या आमदारांना मंत्रीपदासाठी फोन
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
या नेत्यांना आजच्या मंत्रापदाच्या शपथविधीसाठी (Maharashtra Cabinet expansion) फोन आल्याची माहिती आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धनंजय मुंडे यांना देखील मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेगटाकडून आमदारांना मंत्रीपदासाठी फोन
1) उदय सांमत
2) प्रताप सरनाईक
3) शंभूराज देसाई
4) योगश कदम
5) आशिष जैस्वाल
6) भरत गोगावले
7) प्रकाश आबिटकर
8) दादा भूसे
9) गुलाबराव पाटील
नागपुरात होतोय दुसर्यांदा शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet expansion) नागपुरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे. आधी 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेस सोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता. त्यानंतर आता दुसर्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे. त्या शपधविधीची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.