मुंबई : महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या गळ्यात अखेर मंत्रि‍पदाची माळ पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मंत्रि‍पदाची इच्छा अनेक ठिकाणी जाहीरपणे बोलून दाखवलेली होती. मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी मी कोटही शिवून घेतला आहे, असं भाष्यही त्यांनी केलं होतं. मात्र गेल्या काही वर्षांत प्रत्येकवेळी त्यांना मंत्रि‍पदाने हुलकावणी दिली होती. दरम्यान, यावेळी मात्र गोगावले यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली असून त्याआधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते मंत्रि‍पदाच्या शपथेसाठी सराव करत असल्याचं म्हटलं जातंय. 


उदय सामंत यांनी करून दाखवली नक्कल


या व्हिडीओमध्ये भरत गोगावले हे शिवसेना पक्षाच्या आमदारांसोबत बसल्याचं दिसतंय. ते आपल्या सहकारी मित्रांसोबत गप्पा मारत आहेत. या नेत्यांमध्ये एकदम खुल्या मनाने चर्चा होत आहे. याच वेळी मंत्री उदय सामंत यांनी भरत गोगावले यांची नक्कल करून दाखवली आहे. त्यांनी एक रुमाल घेऊन आपल्या काखेत टाकून दाखवलाय. भरत गोगावले अशाच प्रखारे काखेत रुमाल टाकतात, असं ते इतर आमदारांना सांगताना दिसत आहेत.


भरत गोगावलेंनी टॉवेल घेतच...


विशेष म्हणजे उदय सामंत यांनी केलेल्या नकलेनंतर भरत गोगावले यांनादेखील हसू फुटले आहे. त्यानंतर गोगावेल यांनीच रुमाल कसा ठेवायचे, याचं प्रात्यक्षिक आपल्या सहकारी मित्रांना करून दाखवलंय. खुर्चीवरून उठून त्यांनी हा रुमाल कसा ठेवायचा हे सांगितलं आहे. हे सगळंकाही करून दाखवत असताना शिवसेनाच्या बसलेल्या एका नेत्याने मंत्रि‍पदाची शपथ बोलून दाखवली आहे. मंत्रि‍पदाची शपथ घेताना अगोदर राज्यपाल 'मी...' असे म्हणत आमदाराला शपथेची सुरुवात करून देतात. त्यानंतर आमदार आपली सपथ पूर्ण करतो. शपथविधीचा हाच प्रसंग शिवसेनेच्या आमदारांनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. काखेत रुमाल ठेवत असताना कुणीतरी शपथविधी बोलून दाखवल्यामुळे भरत गोगावले शपथविधीचाच सराव करत होते की काय? असे विचारले जात आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


अनेकवेळा दिली मंत्रिपदाने हुलकावणी


दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपल्याला मंत्रि‍पदाची संधी मिळेल अशी भरत गोगावले यांना अपेक्षा होती. त्यांची ही अपेक्षा मात्र बराच काळ पूर्ण झाली नाही. त्यांना वेळोवेळी मंत्रि‍पदाने हुलकावणी दिली. शिवसेनेच्या बंडानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यासह अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रि‍पदाची शपथ मिळाली नाही. आता मात्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली आहे. 


Bharat Gogawale Video News :



हेही वाचा :


Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही


Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?


संघर्ष माझ्या पाचवीलाच, मंत्रीमंडळात संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं, प्रकाश सुर्वेंना अश्रू अनावर