Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने (Election Commission) हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. हरियाणामधील 90 जागांसाठी 1 ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही (Maharashtra Assembly Election) याच वर्षी होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पाऊस झाल्याने बीएलओची काम झाली नाहीत, शिवाय बीएलओची कामही झालेली नाहीत, असं सांगत निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. दरम्यान, आता निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणाची सध्या येईल?  टाईम्स-MATRIZE सर्व्हेमध्ये कोणाला किती जागा दाखवल्या आहेत? हे जाणून घेऊयात... 


महाराष्ट्रात कोणाच्या सर्वांत जास्त जागा येणार?


टाईम्स-MATRIZE सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात भाजपच्या 95 ते 105 जागा येऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 19 ते 24 जागा येण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 7 ते 12 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस पक्षाच्या 42 ते 47 जागा येतील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केला जातोय. याशिवाय, इतर पक्षांच्या आणि अपक्षांचा 11 ते 16 जागा जागांवर विजय होईल, असा दावा ओपिनियन पोलमध्ये करण्यात येतोय. 


कोणाला किती टक्के मतं मिळू शकतात? 


टाईम्स-MATRIZE सर्व्हेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 14.2 टक्के मतं पडू शकतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5.2 टक्के मत मिळणार असल्याचा अंदाज आहे. काँग्रेस पक्षाला 18.6 टक्के तर उद्धव ठाकरेंना 17.6 मतं मिळू शकतात. याशिवाय शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीमध्ये 6.2 टक्के मत मिळवू शकते. अन्य पक्षांना 12.4 मत मिळतील, असा टाईम्स-MATRIZE सर्व्हेचा अंदाज आहे. 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे सर्वात जास्त पसंती


ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे सर्वात जास्त पसंती देण्यात आली आहे. टाईम्स-MATRIZE सर्व्हेनुसार त्यांना 27 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे. तर 23 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना 21 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 


टीप - वरिल सर्व अंदाज टाईम्स-MATRIZE सर्व्हेनुसार देण्यात आले आहेत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या


लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट, आज निवडणूक झाल्यास कोणाचं सरकार?; AI सर्वेक्षणाचा आश्चर्यजनक निकाल


इंदापूरची जागा महायुतीची?; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच काढलं, भरणे मामांचं टेन्शन वाढवलं