Mahadev Jankar and Sanjay Jadhav, Parbhani : परभणी लोकसभा (Parbhani Loksabha) मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांना पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढ्यातून उमेदवारी देण्याचा शरद पवारांचा डाव होता. मात्र महायुतीने शरद पवारांचा डाव उलटला आणि महादेव जानकर यांना गळाला लावले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या परभणीच्या जागेवरुन महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली.   


महादेव जानकर- संजय जाधव नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात एकत्र


परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक होईपर्यंत एकमेकांवर जोरदार आरोप -प्रत्यारोप करणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. परभणीच्या पोखरणी नरसिंह येथील नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार एकत्र आले होते. नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने किर्तन कार्यक्रम होईपर्यंत हे दोघेही एकमेकांसमोर बसून होते. मात्र दोघांनीही एकमेकांना बोलणं टाळलं. नरसिंह जन्मोत्सव झाल्यानंतर हे दोघेही कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.


परभणीत मनोज जरांगेंचा फायदा झाल्याचा संजय जाधव यांचा दावा 


परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव आणि महादेव जानकर आमने-सामने होते. मात्र, या लढतीला आणखी एक किनार होती. मराठा उमेदवार विरुद्ध ओबीसी उमेदवार असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. मी मराठा असल्याने मनोज जरांगे पाटलांचा फायदा मला झाला असल्याची कबुली खुद्द संजय जाधव यांनी दिली होती. शिवाय, बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनाही जरांगेंचा फायदा झाला असल्याचा दावा संजय जाधव यांनी केला होता. कालपर्यंत वेगळी होणारी निवडणूक एकदम जातीवर गेली. त्याचा दगाफटका भविष्यात काय काय होईल हे आत्ताच सांगू शकत नाही. पण, दोन समजात वितुष्ट निर्माण झालंय ही वस्तूस्थिती आहे. जे पेरलं तेच उगवणार, ज्या पद्धतीने लोकांनी महादेव जानकरांचा प्रचार केला, त्याची रिएक्शन मराठा समाजात उमटली . त्यामुळे मराठा समाज एकटवून माझ्या पाठिशी उभा राहिला, असेही संजय जाधव यांनी सांगितले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Mahadev Jankar on Sanjay Jadhav : लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर