M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी (M K Madhavi) यांना शनिवारी (दि.28) अटक करण्यात आली होती. एम के मढवी (M K Madhavi) आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाकडून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एम के मढवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकरे गटाला मिळणार धक्के आणखी सुरुच आहेत. 


एम के मढवी यांच्या अडचणीत वाढ


ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी (M K Madhavi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे 29 एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, राजन विचारेंसोबत निष्ठावंत असणारे एम के मढवी मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार  आहे. या आधी देखील असे धमकवण्याचे प्रकार झाले आहेत का ? अशा तक्रारी एम के मढवी यांच्या विरोधात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मडवींची या प्रकरणातून कधी सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


खंडणी विरोधी पथकाकडून मढवींना अटक 


नवी मुंबई या ठिकाणी एम के मढवी (M K Madhavi) यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.  पुढील चौकशीसाठी ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आले होते. एम के मढवी यांचे पत्नी आणि दोन मुलं देखील खंडणी विभागात दाखल झाले होते. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्यातून ठाकरेंना राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात असतानाच त्यांचे शिलेदार अडचणीत आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Tanaji Sawant : अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले, ही स्थिती राहिली नाही, आता मोहितेंना चहा पाजायला माणूस नाही, तानाजी सावंतांचा हल्लाबोल