Sanjay Raut : शरद पवार भटकती आत्मा आहे तर केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचं तुम्ही समाधान करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमच्या आत्म शांत होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 


नरेंद्र मोदी आणि आमित शाह इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात. केंद्रीय यंत्रणा या मोदी-शाहांचा आत्मा आहे, त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  


नरेंद्र मोदी आणि अमित शाह दुसऱ्याच्या ताकदीला खूप घाबरतात. यांची खरी ताकद केंद्रीय यंत्रणा आहे. ईडी, इन्कमटॅक्स, पोलीस, सीबीआय हा त्यांचा आत्महा आहे. ही ताकद काढल्यास हे काहीच नाहीत. काही दिवसांत खेळ सुरु होईल. फडणवीसांनी इडी, सीबीआय हे बाजूला सारुन मैदानात उतरावे. आमच्यासमोर एक मिनिटही टिकणार नाहीत. तुमच्यासारखे घाबरट लोक मी राजकीय आयुष्यात पाहिले नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.  


एनडीएतील सर्व आत्मे अतृप्त -


मोदींनी सर्वात आधी दोन अतृत्प आत्म्यासाठी शांती करायला हवी. मंत्रिमंडळाची निवड झाली, पोर्टफोलिओची वाटणी केली, त्यामुळे एनडीएचे मित्रपक्षातील सगळे आत्मे अतृप्त आहेत. महाराष्ट्रातील आमचे सगळ्याचे आत्मे अतृत्पतच आहेत. महाराष्ट्रात जोपर्यंत आमचं सरकार बनत नाही, तोपर्यंत आमची आत्मा भटकतच राहणार असे राऊत म्हणाले. 


महाराष्ट्रात आम्ही सरकार स्थापन करु - राऊतांचा विश्वास


महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका ताकदीने लढणार आहे. लोकसभापेक्षा जास्त मजबूतपणे विधानसभा निवडणूक लढणार आहोत. राज्यात आम्ही सरकार स्थापन करु, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. 


मुस्लिम मंत्री का नाही बनवला, राऊतांचा सवाल


आता आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाही. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंना प्रश्न विचारणार.. कारण, त्यांच्यामुळेच एनडीएचे सरकार आहे. या दोघांनी मेहरबानी आहे, तोपर्यंत केंद्रात मोदींचं सरकार आहे. मोदींनी स्वत:चं सरकार स्थापन केले नाही. निवडणूक प्रचारात मोदींनी आपलं रुप स्पष्ट केले. मोदींना देशात हिंदू मुस्लिम करायचे आहे.  मोदींना वाटतेय की मुस्लिमांनानी मत केले नाही, त्यामुळे एकही मुस्लिम मंत्री नाही. पण हे संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधानमंत्री एका जातीचा नसतो, तो सर्व जाती-धर्माचा असतो. आम्ही नितीशकुमार आणि चंद्राबाबूंना हे मान्य आहे का? हा प्रश्न त्यांना विचारणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी आपल्या कोट्यातून मुस्लिम मंत्री का नाही बनवला. त्यांच्यावर दबाव होता का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 


सरकार फारकाळ टिकणार नाही - राऊत


नितीशकुमार, चंद्राबाबू आणि चिराग पासवान यांना काय मिळाले, मांझी यांना कोणतं मोठं मंत्रिपद मिळाले... कुणालाचं मोठं मंत्रिपद मिळाले नाही. रेल्वे, अर्थ, अध्यक्षपद मागितलं, पण मिळाले नाही. भाजपने सर्व मोठी खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. ज्या आधारावर सरकार झालेय, नितीशकुमार, चंद्राबाबू, पासवान यांना काहीच मिळाले नाही. मला वाटतेय हे सरकार टीकणार नाही. 


मोहन भागवत, तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय ? 


मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवावे. मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा.  तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय ??  मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावं.  जसे जे पी नड्डा यांनी सांगितलं.. ते म्हणाले होते संघाची आम्हाला गरज नाही.  हे जर अखंड भारताचे सरकार वाटत नसेल तर हे सरकार मोहन भागवतांनी खाली खेचावं त्यांची तेवढी क्षमता आहे, असे संजय राऊत म्हणाले. 


सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष


जेव्हा पक्ष जागेवर असेल तेव्हा मनसेमध्ये अस्वस्थता असेल. एकनाथ शिंदे अजित पवार राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असे संजय राऊत म्हणाले. 


हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. त्यांना काम दिलेले आहे की शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिले आहेत. या सुपार्‍या त्यांनी यासाठी स्वीकारले आहेत  कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू, असे संजय राऊत म्हणाले.