MVA seat sharing formula मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA seat sharing formula) लोकसभेच्या 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. या 40 जागांमध्ये कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही 8 जागांवरून तिढा कायम आहे. या 8 जागांवर उद्धव  ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) वाटाघाटी सुरु आहेत. त्यातच प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही महाविकास आघाडीत समावेश असल्याने, त्यांच्या पक्षांनाही एक एक जागा देण्यात येणार आहे. या दोन्ही जागा सध्या तरी ठाकरेंच्या वाट्यातून देण्यात येणार असल्याचं  सांगण्यात येत आहे. 


महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत.  याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र 2019 मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही.


वंचित आणि स्वाभिमानीला ठाकरे गटातून जागा?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या मविआ मधील समावेशनंतर वंचित बहुजन आघाडी सुद्धा जागा वाटपासंदर्भात आपली भूमिका 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत ठेवणार आहे.


वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची (Akola Lok Sabha) जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावं लागेल. वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो.


*राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत झालेली चर्चा आणि तिढा असलेल्या एकूण जागा*



  • काँग्रेस - 14

  • ठाकरे गट - 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)

  • राष्ट्रवादी काँग्रेस -9

  •  तिढा असलेल्या जागा - 8 


MVA Seat Sharing : कोणत्या मतदारसंघाची जागा कोण लढवणार?


१) रामटेक -तिढा कायम 


२ ) बुलढाणा - शिवसेना ठाकरे गट 


३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट 


४) हिंगोली - तिढा कायम 


५) परभणी -शिवसेना ठाकरे गट 


६) जालना -तिढा कायम 


७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट 


८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट 


९) पालघर -शिवसेना ठाकरे गट 


१०) कल्याण - शिवसेना ठाकरे गट 


११) ठाणे - शिवसेना ठाकरे गट 


१२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम 


१३) मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट 


१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट 


१५) मुंबई दक्षिण मध्य - तिढा कायम 


१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट 


१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग - शिवसना ठाकरे गट 


१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट 


१९) शिर्डी - तिढा कायम 


२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट 


२१) कोल्हापूर - शिवसेना ठाकरे गट 


२२) हातकणंगले - ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)


२३) अकोला - (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार)


२४) शिरूर - राष्ट्रवादी 


२५) सातारा -राष्ट्रवादी


२६) माढा- राष्ट्रवादी


२७) बारामती -राष्ट्रवादी


२८) जळगाव -राष्ट्रवादी


२९) रावेर -राष्ट्रवादी


३०)दिंडोरी -राष्ट्रवादी


३१) बीड -राष्ट्रवादी


३२) अहमदनगर -राष्ट्रवादी


३३) अमरावती -काँग्रेस 


३४) भंडारा - काँग्रेस  


३५) चंद्रपूर -काँग्रेस 


३६) गडचिरोली - काँग्रेस 


३७) नांदेड -काँग्रेस 


३८) लातूर -काँग्रेस 


३९) धुळे -काँग्रेस 


४०) नंदुरबार -काँग्रेस 


४१) पुणे -काँग्रेस 


४२) सोलापूर - काँग्रेस 


४३) सांगली -काँग्रेस 


४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस 


४५) मुंबई उत्तर -काँग्रेस 


४६) भिवंडी -तिढा कायम 


४७) वर्धा- तिढा कायम 


४८) नागपूर -काँग्रेस  


तिढा असलेल्या जागी विद्यमान खासदार कोण? 



  • रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना शिंदे गट)

  • हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)

  • वर्धा - रामदास तडस (भाजप)

  • भिवंडी - कपिल पाटील (भाजप)

  • जालना - रावसाहेब दानवे (भाजप)

  • शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)

  • मुंबई दक्षिण मध्य - राहुल शिवाळे  (शिवसेना शिंदे गट)

  • मुंबई उत्तर पश्चिम  - गजानन कीर्तिकर (शिवसेना शिंदे गट)


संबंधित बातम्या 


 MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?   


जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस, 40 जागांवर सहमती!