मुंबई : केंद्रातील अनेक मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 ) उतरविण्याचा भाजपचा (BJP) प्लॅन आहे. तसेच राज्यसभेच्या खासदारांना (Rajya Sabha MP) देखील लोकसभेच्या निवडणुकीत उतरविण्याचा भाजपचा प्लॅन आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) लोकसभेवर पाठवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्याच्यासमोर कोणताही उमेदवार टिकू शकणार नाही, अशी आज परिस्थिती आहे. अशी माहिती दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मार्च 2024 मध्ये नारायण राणेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. 


ठाकरे गटाकडून विनायक राऊत मैदानात ?


केंद्रातील अनेक मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असून राज्यसभेवरील खासदारांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवल जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांची  या अगोदरच घोषणा करण्यात आली आहे. मात्र महायुतीकडून अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे नेमकी वर्णी कुणाची लागणार हे पहावं लागणार आहे.


नावं अनेक,महायुतीकडून नेमकं कोणाला तिकीट मिळणार ?


दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची माहिती दिली आहे. या अगोदर भाजपकडून प्रमोद जठार, रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती तर शिंदे गटाकडून किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नेमकं कोणाला तिकीट मिळणार हे पहावं महत्त्वाचा आहे.


सध्या दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपाने केली आहे. तसेच केसरकर यांनी नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकू शकणार नाही अशी सध्याची स्थिती असल्याचा म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीत भाजपची तशी रणनीती असल्यास भाजपला महाराष्ट्रात मिशन 45 अंतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात फायदा होऊ शकतो. मात्र याबाबत नारायण राणेंकडून कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.


वैभव नाईक काय म्हणाले ?


विधानसभेत पराभव झालेले नारायण राणे मागच्या दाराने राज्यसभेवर गेले. लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरल्यास आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल. मात्र पराभव झालेल्या माणसांनी लोकसभेत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याच धारिष्ट होत नाही. आणि जर नारायण राणेंचं लोकसभेच्या रिंगणात उभ राहण्याचे धारिष्ट झालं तर त्यांना समजेल अशी प्रतिक्रया वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत दिली आहे.


आणखी वाचा :


Lok Sabha Election 2024: ठाकरेंनी एक मतदारसंघ सोडला, पवारांनीही एक सोडला, पूर्व विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा!