Lakshman Hake: मराठा- ओबीसी आरक्षणावरून आता आरोप प्रत्यारोप वाढले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. छत्रपतींच्या वारसांना ते खासगीत खालच्या भाषेत बोलतात. त्यांना त्यांची गादी निर्माण करायची आहे. असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय. 'छत्रपती संभाजीराजे उदयन महाराजांबद्दल तो खूप काही बोललेला आहे. महाराष्ट्राला ते बऱ्यापैकी माहिती आहे. असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जालन्यात गुरुवारी रात्री झालेल्या गोंधळानंतर मराठा ओबीसी आंदोलक टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.


काय म्हणाले लक्ष्मण हाके?


एका बाजूला शिवरायांच्या गादीचा सन्मान करतो म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या बाबतीत तू काय काय बोलला हे महाराष्ट्राला सांगू का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला. जरांगेंना स्वत:ची गादी निर्माण करायची आहे. गादी निर्माण व्हायला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. शिव्या देऊन गादी निर्माण होत नसते. असंही ते म्हणाले.


छत्रपतींच्या वारसांना  खालच्या भाषेत बोललेत


छत्रपतींच्या वारसांना जरांगें खालच्या भाषेत बोलतात. छत्रपती संभाजी राजे उदयन महाराजांबद्दल तो खूप काही बोललेला आहे. महाराष्ट्राला बऱ्यापैकी ते माहिती आहे. पण माझ्या तोंडून ऐकू नका, जरांगे नासक्या डोक्याचा माणूस असल्याची टीका त्यांनी मनोज जरांगेंवर केली.


आम्हाला सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नका


चार पिढ्या खपल्यात एसटीची मागणी आहे ती दिली आहे का ? तू आम्हाला सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नको, आमचे कर्तव्य आहे ओबीसीचा आरक्षण वाचवणे. हा खरा मनोरुग्ण माणूस, त्याला काही माहिती नाही. परभणीत कशाला गेला होता माधव जानकर यांना पराभूत करायला? आणि इकडे तिकडे धनगरांसोबत भांडण नाही म्हणतो. असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केलाय.


मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केलाय


तुम्ही खरेच शिवाजी महाराजांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पाईक आहात का एकनाथराव.? असा सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. मुख्यमंत्र्याना आम्ही 12- 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात याची आम्ही आठवण करून देतो. ते कोणत्या धुंदीत आहे माहित नाही.. त्यांच्याकडे पैशाची खोके खूप आहेत असं आम्ही ऐकतो , आणि पैशाचे खोकर मी पुन्हा मी मुख्यमंत्री होणार असं त्यांना वाटतंय. ते फक्त पाहुण्यांच्या आंदोलनाकडे जातात , मग ते शंभूराजे सही असो बंडू जाधव असो किंवा संदिपान भुमरे असो. असं ते म्हणाले.