मुंबई : 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


मंत्री तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही तांत्रिक अडचणी संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारावे जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य  होणार  नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये,असे सांगून  मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन


ज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.


गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही


गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचवतात. त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.




इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Lanke on Ram Shinde : पवारांचा नाद करू नका अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल, निलेश लंकेंचा कर्जत जामखेडमधून राम शिंदेंना इशारा