Congress: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीतील पराभवानंतर ते म्हणाले आहेत की, गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. पक्षनेतृत्वावर निशाणा साधत ते म्हणाले आहेत की, तुम्हाला जर पराभवाची कारणे माहीत नसतील, तर तुम्ही कल्पनालोकात जगात आहोत, असे ते म्हणाले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे.


द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला आश्चर्य वाटले नाही.'' ते म्हणाले, "सीडब्ल्यूसीच्या बाहेरही काँग्रेस आहे. तुम्हाला हवे असल्यास त्यांचे मत ऐका. आमच्यासारखे अनेक नेते आहेत, जे सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत. पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही सीडब्ल्यूसीमध्ये नसलो तरी आम्हाला फरक पडत नाही का? देशभरात केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील असे अनेक काँग्रेसजन आहेत, जे असा विचार करत नाहीत."


2024 साठी प्रियांका गांधी यांची तयारी सुरू


गांधी परिवार कल्पनालोकात जगत असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले आहेत. निवणुकीत पराभवानंतरही प्रियंका गांधी वड्रा यांनी पराभव स्वीकार केलेला नाही. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये 2024 साठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रियंका गांधी यांनी रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील पराभवावर विचारमंथन केले, परंतु त्यापूर्वी त्यांनी काही तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली.


दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या 399 उमेदवारांपैकी 387 उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. यावेळी काँग्रेसला केवळ 2.33 टक्के मते मिळाली. यूपीमधील काँग्रेसच्या इतिहासातील ही सर्वात वाईट कामगिरी होती.

महत्वाच्या बातम्या


उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास


India Presidential Election : उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर नितीश कुमार सोडणार भाजपची सात? लवकरच घेऊ शकतात निर्णय