Kanhaiya Kumar : उत्तर पूर्व दिल्लीचे काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार यांना एका युवकाने कानशिलात लावल्याची घटना समोर आली आहे. हार घालण्यासाठी म्हणून पुढे आलेल्या युवकाने कन्हैय्या कुमार यांच्या गळ्यात हार घातला. मात्र, त्यानंतर लगेच त्याच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रचार सुरु असतानाच कन्हैय्या कुमारला कानाखाली लगावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (दि.17) उत्तर पूर्व दिल्लीतील इस्लामपूर भागात घडली आहे. या दरम्यान आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवक बदसलूकी छाया शर्मा यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


कन्हैया कुमारचा व्हिडीओ व्हायरल


युवकाने कन्हैया कुमारला कानशिलात लगावल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हल्ला करण्यासाठी आलेला युवक प्रथम कन्हैय्या कुमार यांना हार घालताना दिसतोय. त्यानंतर त्याने त्यांच्या कानशिलात लगावली आहे. दरम्यान, कन्हैय्या सोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी लागलीच हल्ला करण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेतलं आहे. 






आप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार 


हल्लेखोरांविरोधात आप नगरसेवक छाया शर्मा यांनी तक्रार नोंदवली आहे. छाया शर्मा तक्रारीत म्हणातात, आज सायंकाळी सत्यनारायण भवन पार्षद कार्यालयाजवळ आमची मिटिंग झाली. या बैठकीनंतर 7 ते 8 शस्त्रधारी लोक आमच्या बिल्डिंगमध्ये घुसले. त्यांनी कन्हैय्या कुमार यांना हार घातला आणि कानशिलात लगावली. याशिवाय हल्लेखोरांनी मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हल्लेखोरांनी माझ्यासह 30 ते 40 लोकांवर शाई फेकली आहे. त्यामुळे तीन ते चार महिला जखमी झाल्या आहेत, असं छाया शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut : गल्लोगल्ली फिरतायत, आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणलंय, मोठा भाई-छोटा भाई कुठलाच भाई राहणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल