Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, कल्याण लोकसभेत (Kalyant Loksabha) मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. कारण उद्धव ठाकरेंनी दोघांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगण्यावरुन वैशाली दरेकर आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


दोघांपैकी एकजण उमेदवारी अर्ज मागे घेणार 


सहा तारखेला स्क्रुटनीच्या दिवशी ठाकरे गट एबी फॉर्म बदलण्याची शक्यता आहे. वैशाली दरेकर किंवा रमेश जाधव दोघांपैकी एक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमेश जाधव यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मातोश्रीवरुन आदेश आल्याचे त्यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी महापौर रमेश जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी फोनद्वारे संपर्क केला. उमेदवारी अर्ज भरण्यास आज जाधव यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 


कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांना उमेदवारी 


कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी दिली आहे. उर्वरित जागांवर उमदेवार देतानाच ठाकरेंनी कल्याणच्या उमेदवाराची घोषणा केली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात वैशाली दरेकर लढणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, अर्ज बाद झाल्यास पर्याय म्हणून रमेश जाधव यांचा पर्याय राहावा म्हणून ठाकरेंनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. 


देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर शिंदेंना स्वत:च्या मुलाचे तरी तिकीट वाचावता येईल का? असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत होता. दरम्यान, महायुतीकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच कल्याण लोकसभा लढवतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच कल्याण लोकसभा लढतील हे स्पष्ट झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amit Shah Speech : राहुल गांधी अन् शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत, शाहांचा ठाकरेंवर हल्लाबोल