Kalicharan Maharaj, नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा गेल्या ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत होता. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळ्या अवघ्या आठ महिन्यांनंतर कोसळला होता. दरम्यान त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. याबाबत आता कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबतही भाष्य केलं. मला राजकारणात यायला आवडेल, असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
कालीचरण महाराज काय काय म्हणाले?
कालीचरण महाराज म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना वेदनादायक आहे. मुख्य नेत्याला दोषी धरण्यापेक्षा पुतळा बनवणारा 500% दोषी आहे. विरोधकांचं काम राजकारण करणे आहे. हिंदूंनी संघटित होणे हेच अंतिम काम आहे. हिंदूंना लढणे किंव्हा मारणे हाच पर्याय आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे.
बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती
पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, संधी मिळाली तर नक्कीच राजकारणात येण्यास आवडेल. भारत हिंदु राष्ट्र म्हणून बनला पाहिजे हाच माझं प्रयत्न असेल. बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानातील हिंदूंना मुसलमानांनी कापून टाकले. हिंदूंना जागृत व्हावे लागेल अन्यथा मुसलमान व्हावं लागेल.
बालाजी फाऊंडेशनचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
नाशिक शहरात गणेश उत्सवाचा उत्साह जोरदार पाहायला मिळतोय. बालाजी फाऊंडेशनचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. बालाजी फाऊंडेशनकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. नाशिकमध्ये उभारला उज्जैन महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्या महाकाल शिव तांडव नृत्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. बालाजी फाऊंडेशन गणपतीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मुख दर्शन सोहळा पार पडला. महाकाल तांडव बघण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या