मुंबई : 'राम (Ram) हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, असे वक्तव्य करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. असे असतानाच आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राज राजपूरकर (Raj Rajpurkar) यांनी दिली आहे. "आव्हाड साहेबांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी केली जात असून, त्यांना जीवे मारण्याची धमक्या सुरु झाल्या असल्याचे राजपूरकर म्हणाले आहेत. 


दरम्यान यावर बोलतांना राज राजपूरकर म्हणाले की, "आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या वाचनातून अभ्यासपुर्व केलेलं आहे. सुधीर फडके, ग.दी. माडगूळकर यांच्या गीत रामायनातून गायलेल्या काव्यामधून सर्व संदर्भ मिळतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी या रामायनातील कविता गायल्या गेल्या आहेत. राम हे क्षत्रिय होते, शिकार तर ते करणारच,  रामायनात देखील उल्लेख आहे. कानपुरच्या विद्यार्थ्यांनी रामायणाचा अभ्यास करुन माहिती काढली त्यातून देखील ही माहिती समोर आली आहे. वाल्मिकी यांनी केलेल्या रामायनात संदर्भ आहे. तो तुम्हाला मान्य नाही का?, असा प्रश्न राज राजपूरकर यांनी उपस्थित केला. 


राम हा बहुजनांचा 


भाजपच्या लोकांकडे आधी रामाचं चित्र होत का?, ज्या मंदिरात राम बसवत आहात एवढी घाई करत आहात, ते मंदिर तरी पुर्ण आहे का?, असे राजपूरकर म्हणाले. तर, शबरी आदिवासी होत्या, त्यांची बोर रामाने खाल्ली, म्हणजे राम बहुजणांचे होते. बहुजनांचे राम तुम्हाला मान्य नाही का?, राम मास खात होते त्यात रामाची कोणतीही विटंबना नाही. आपल्या राज्यातील कित्तेक मंदिर अशी आहेत देव, देविता आहेत त्यांना मांसाहार नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही जो राम दाखवता तो आम्हाला मान्य नाही, आमचा राम हा बहुजनांचा राम आहे, असेही राजपूरकर म्हणाले. 


रामायण लिहिणारे वाल्मिकी यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? 


आम्ही सर्व बहुजन आव्हाड यांना समर्थन देतो, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आज फक्त सुधीर फडके, ग दी माडगूळकर यांनी गायलेल्या रामायनातील काव्यामधला संदर्भ दिला. पुरावे दिले असे अजुन देखील पुरावे पुढे येतील. आव्हाड यांच्यावर कारवायची मागणी करत असाल, आंदोलन करत असाल तर सुधीर फडके, ग दी माडगूळकर, आचार्य केशव शास्त्री, रामायण लिहिणारे वाल्मिकी यांच्या विरोधात पण आंदोलन, निदर्शने आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार का? असेही राजपूरकर म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणारच, आदेशही निघाले; संजय शिरसाटांची माहिती