छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह अनेक मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहराच्या दौऱ्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या मुलाचे आज लग्न आहे. त्यामुळे या लग्नाला राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित असणार आहे. 


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुलगा धर्मराज दानवे याचा आज शहरातील बीड बायपास वरील लॉन्समध्ये लग्न सोहळा पार पडत आहे. या लग्नासाठी अनेक राज्यातील अनेक महत्वाचे राजकीय नेते, उद्योजक, उपस्थित राहणार आहे. याच लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सायंकाळी शहरात येणार आहे. तसेच,रात्री 8.30 वाजता विमानाने पुन्हा मुंबईला रवाना होतील. 




पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक व्हीआयपी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. विमानतळापासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस असणार आहे. सोबतच व्हीआयपीच्या ताफ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी देखील पोलिसांकडून घेतली जाणार आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांचा संभाजीनगर दौरा...


सायं 06.30 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण.


सायं 07.15 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने डिवाईन मिटी (सहारा मिटी), बीड बायपास, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.


सायं 07.30 वा विधानपरिषद, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- डिवाईन सिटी (सहारा सिटी), बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर)


रात्री 08.15 वा : मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण


रात्री 08.30 वा : छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मंबईकडे प्रयाण


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सायं. 06.40 वा. VT-VRS या विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन. 


सायं. 06.45 वा. मोटारीने डिवाईन सिटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.


सायं. 07.00 वा. डिवाईन सिटी बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.


सायं. 07.00 वा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती.


सायं. 07.20 वा.मोटारीने हॉटेल एम्बेसेडर छत्रपती  संभाजीनगरकडे प्रयाण.


सायं. 07.40 वा. हॉटेल एम्बेसेडर, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.


सायं. 07.45 वा. मोहनराव जगताप यांची कन्येच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती.


रात्री 08.10 वा. औरंगाबाद विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.


रात्री 08.15 वा. VT - VRS या विमानाने प्रयाण.


इतर महत्वाच्या बातम्या: 


लाठीचार्ज करा, इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, गौतमीच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांचे आदेश