Jitendra Awhad on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.14) पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडणुकीत पाडण्याबाबत भाष्य केलं. स.का. पाटलांचा प्रचार करताना 'पापापा' असं लिहून प्रचार करत होते. आता काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे. पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधानावर अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना प्रत्युत्तर 


अजित पवारांच्या विधानाची 'एबीपी माझा'ने दिलेली बातमी जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली आणि प्रत्युत्तर दिले. ट्वीटरवरुन 'एबीपी माझा'ची बातमी शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, "कारण पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस २०१९ सारखी माफी नाही .गद्दारांना माफी नाही !"






काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे; अजित पवार काय म्हणाले?


अजित पवार गटाचा सोशल मीडिया मेळावा आज (दि.14) पार पडला. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. शिवाय महिलांवर टीका करायची नाही, अशी तंबी देखील दिली. अजित पवार यांनी एक उदाहरण देत म्हणाले की, स.का पाटलांचा प्रचार करताना 'पापापा' असे लिहून प्रचार केला जात होता. आता 'काकाका' असे लिहून प्रचार केला पाहिजे. पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे. त्यामुळे आता अजित पवार यांनी थेट शरद पवारांविरोधात थंट थोपटण्यास सुरुवात केली आहे. 


आव्हाड आणि अजित पवारांमध्ये यापूर्वीही शरद पवारांबाबतच्या वक्तव्यांमुळे वाद  


गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये बारामती लोकसभा जागेवरुन चांगलाच संघर्ष सुरु आहे. बारामती मतदारसंघाचा दौरा अजित पवार यांनी केला. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती.या टीकेनंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर पलटवार केला होता. "काकांच्या मरणाची वाट पाहत आहेत", तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते, अशी टीका केली होती. यानंतर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचा ध चा मा करण्यात आला, असा आरोप केला होता.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बैठक बोलावली, पण 12 आमदारांची दांडी! बाळासाहेब थोरात म्हणाले..