Mumbai : "जितेंद्र आव्हाडांनी मंत्री असताना लोकांना बंगल्यावर नेऊन मारहाण केली. लोकांचं अपहरण केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झाले आहेत", असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केलाय. विधानसभेत बोलताना अतुल भातखळकर यांनी आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, भातखळकरांच्या आरोपांना आव्हाडांनी अद्याप कोणतेही प्रत्युत्तर दिलेलं नाही. 


देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लोक हक्क हा एक क्रांतीकारी कायदा आणला


अतुल भातखळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लोक हक्क हा एक क्रांतीकारी कायदा आणला. सर्वसामान्य लोकांच्या समस्या बाबी पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी हा कायदा आणला गेला. मात्र, या कायद्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं, तेवढ लक्ष दिल गेलेलं नाही. त्यामुळे राज्यसरकारने विस्तृत चार पानांचं उत्तर दिलंय. हे उत्तर वाचल्यानंतर लक्षात येत की सरकारने या कायद्याबाबत सरकारने अनास्था दाखवली. 


जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल 


लोकसभा निवडणुकीत 45 जागा येणार असं म्हणणारे 17 जागांवर आले. त्यामुळे सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प मरता क्या  नही करता? असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सत्ताधाऱ्यांनी ज्या योजना घोषित केल्या आहेत, त्या सत्यात उतरणार आहेत का? असा प्रश्न आहे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हे वास्तव आहे. तु्म्ही त्याला विरोधकांचे नेरेटिव्ह म्हणता. तुम्ही मुस्लिमांच्या मतांना व्होट जिहाद म्हणता. तर तुम्हाला मुस्लिम मत का देतील? भारती पवार, सुधीर मुनगंटीवार पराभूत झाल्या त्या मतदारसंघात किती मुस्लीम मतदार आहेत? असा सवालही आव्हाड यांनी केला. 













इतर महत्वाच्या बातम्या 


Varsha Gaikwad : गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही, 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका बसला, वर्षा गायकवाड यांची लोकसभेत फटकेबाजी