Varsha Gaikwad, Delhi : "मी देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद देऊ इच्छिते. जनतेने भारतीय जनता पक्षाचे 400 पारचे स्वप्न स्वप्न संपुष्टात आणले. मात्र, 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका बसलाय. भाषणात महागाईबद्दल बोलत नाहीत", असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या. त्या लोकसभेत (Loksabha) बोलत होत्या. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी लोकसभेत जोरदार फटकेबाजी केली. 


श्रीरामाचे मंदिर झाले पण राष्ट्रपतींना बोलावण्यात आले नाही


वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  म्हणाल्या, मी संसद भवनमध्ये आले तेव्हा मला फार चांगले वाटले. पण संसद भवनाचे उद्घाटन आणि भूमीपूजन महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते तर मला आणखी चांगले वाटले असते. एका आदिवासी महिलेचा सन्मान झाला असता. रामनाथ कोविंद यांनाही हा सन्मान मिळाला असता. श्रीरामाचे मंदिर झाले पण राष्ट्रपतींना बोलावण्यात आले नाही. मी याबाबत खेद व्यक्त करते. महामहिम राष्ट्रपतींचे पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे.


तरीसुद्धा गद्दारांना महाराष्ट्रात थारा मिळणार नाही


पुढे बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  म्हणाल्या, महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलय की, सरकारी तिजोरीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. सरकारी यंत्रणांचा वापर केला. तरीसुद्धा गद्दारांना महाराष्ट्रात थारा मिळणार नाही. 400 पारचा नारा दिला, पण भाजपचे स्वप्नभंग करण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेने केले. 


ज्याठिकाणी तुतारी होती, त्याठिकाणी पिपाणी होती


निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडली नाही. एव्हिएम मशीनवर एकसारखे चिन्ह नसायला पाहिजे होते. पण महाराष्ट्रात आपण पाहिले, ज्याठिकाणी तुतारी होती, त्याठिकाणी पिपाणी होती. जिथे मशाल होती, तिथे चिमणी होती. या प्रकारची कामं निवडणूक आयोगाने केली आहेत. भाजपचा 400 पारचा नारा होता, त्यासाठी सर्वकाही सुरु होती. 400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी होता, आरक्षण रद्द करण्यासाठी होता. हे भाजपच्या लोकांनीच सांगितलं होतं. त्यांना अपेक्षा नव्हती की जनता यांना झटका देणार आहे, असंही वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी नमूदं केलं.









इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका, लाडकी बहिण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन