Nishikant Patil on Jayant Patil : माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. जयंत पाटील यांनी एका मेडिकल कॉलेजवर छापा आणि त्या कॉलेजवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले होते,असा आरोप केला होता. यावर ज्या मेडिकल कॉलेजचा परमवीर सिंग यांनी उल्लेख केला त्या प्रकाश मेडिकल कॉलेजचे संस्थापक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीये.
निशिकांत पाटील काय काय म्हणाले?
निशिकांत पाटील म्हणाले, सुसंस्कृत, शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला असून त्यांचा मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे. राजकीय द्वेषपोटी अनेक कुटुंबे उद्धवस्त केली. त्यांच्या संस्था संपवू पाहणाऱ्या या आमदारांना यापुढील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी क्रांतीकारक मातीतील मतदार पुढे येईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.
जयंत पाटलांनी सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलं : परमबीर सिंह
परमबीर सिंह म्हणाले, राजकीय विरोधकांवर कारवाईसाठी दबाव आणला जात होता. गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला होता. अनिल गोटे, चव्हाण, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माझ्यावर दबाव आणला, मी नकार दिला. 2020 मधील हा प्रकार आहे. जयंत पाटील यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. प्रविण दरेकर यांच्यावर देखील कारवाईसाठी दबाव होता. परंतु मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही. ठाण्यात माझ्या विरोधात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्या केसमध्ये फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असे परमबीर सिंह म्हणाले.
प्रकरणाचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत : परमबीर सिंह
चांदिवाल कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा महाविकासआघाडीचे सरकार होते त्यात काय आहे हे त्यांना जास्त माहीत असेल. माझ्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत. गरज भासल्यास योग्य वेळी समोर आणेन. हे प्रकरण अनिल देशमुखांपुरते मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहेत. योग्य वेळी सत्य समोर यईल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी देशमुख यांनी सांगितलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या