Jayant Patil on Sunil Tatkare : "सुनील तटकरे हे सत्तेच्या मस्ती मध्ये आहेत. सत्ता नसेल तर पाण्याच्या बाहेर मासा जसा तडफडतो तसेच हे तडफडतात. महाराष्ट्रात जयंत पाटील कसे आहेत ते जनता ओळखते आणि तटकरे कसे आहेत ते देखील जनता ओळखते. आमचा शेकापला आज ते छोटा पक्ष बोलतात. मात्र चार तारखेला काउंटिंग केल्यावर नकली राष्ट्रवादीची एकही सीट येणार नाही. तेव्हा ते  काय करणार आहेत ते सांगा ", असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) म्हणाले. सुनील तटकरेंनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेचा जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर कडाडून टीका केली. 


डुप्लीकेट राष्ट्रवादीची एकही जागा निवडून येणार नाही


जयंत पाटील म्हणाले, अनंत गीते यांच्याबद्दल बोलण्याची विकास गोगावलेंची  उंची पण नाही. त्याच्यावर मला काही बोलायचेही नाही. विकास गोगावले यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवाय, शेकापला छोटा पक्ष म्हणणाऱ्या सुनील तटकरेंवरही जयंत पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला. डुप्लीकेट राष्ट्रवादीची एकही जागा निवडून येणार नाही, तेव्हा हे काय करणार आहेत? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केलाय. 


सुनील तटकरे काय म्हणाले होते? 


ज्या समाजाच्या नावावर मत मागून अनंत गीतेंनी राजकारण केलं, त्या समाजाला सुद्धा सातत्याने उपेक्षित ठेवलं गेलं. धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. भरतशेठ तुम्ही आज वर्मावर बोट ठेवलं. तुम्ही 3 हजार कोटींची कामे करुन दाखवलीत. स्वत: पुरोगामी म्हणवणाऱ्या जयंत पाटलांनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं कर्नाटकात मुस्लीमांबाबत जसं घडतय. तसं तु्म्ही याठिकाणी कराल, असं मुस्लीम बांधवांना सांगितलं. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. तुम्ही पर्वाच्या सभेत काय ऐकलंत. त्यावेळी तुम्ही म्हणलात मी गद्दार आहे. शेकापच्या हद्दपार होण्यामागे जयंत पाटील आहेत. तुम्ही शिवसेनेच्या पाया पडलात. आज एकही आमदार विधानसभेत नाही. ही तुमची कामगिरी आहे. तुम्ही मला लोकसभेत मदत केली, पण मी सुद्धा तुम्हाला मदत केली. 17 हजारांचे मताधिक्य मला जयंत पाटील यांच्यामुळे मिळाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dhananjay Munde on Sharad Pawar : तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात, धनंजय मुंडेंची शरद पवारांवर जहरी टीका