Jayant Patil on Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. महायुतीत असूनही गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ आपल्या मित्र पक्षांना आणि स्वत:च्या पक्षालाही अडचणीत आणणारी भूमिका घेत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ घरवापसीच्या विचारात आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ नेमकं कोणाच्या बाजून आहेत? हे तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर समजेन असं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


छगन भुजबळ यांनी कोण कोणती वक्तव्य केली ? 


लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याचा फटका बसला. कारण दलित समाजाची समजूत झाली की, 400 म्हणजे संविधान बदलणार. त्यामुळे आम्हाला ते लोकांच्या डोक्यातून काढण्यात नाकीनऊ आले, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यामुळे भाजपलाही छगन भुजबळ यांच्यावर काऊंटर अॅटॅक करावा लागला. शिवाय छगन भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी लोकसभेला जागावाटपात घटक पक्षांकडून दबाव तंत्राचा वापर झाला, तो आता राष्ट्रवादीच्या बाबत विधानसभेला व्हायला नको, असंही म्हटलं. शिवाय, विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा राष्ट्रवादीला आम्ही देऊ, असं आश्वासन सत्तेत सहभागी होताना भाजपने दिलं आहे. त्याची आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली. त्यामुळे छगन भुजबळ महायुतीच्याच्या विरोधात किंवा महायुतीला अडचणीत आणणारी वक्तव्य का करत आहेत? असा सवाल विचारला जाऊ लागला. 


जितेंद्र आव्हाडांची पाठराखण 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार  जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) फोटो फाडण्यात आला. यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. आव्हाडांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे भुजबळांनी म्हटले.  छगन भुजबळ म्हणाले की, दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे. आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहे. त्यांचा विरोध निश्चितच करा.


इतर महत्वाच्या बातम्या 


Beed Lok Sabha: माझाही पराभव झाला होता, तुम्ही आदळआपट करुन काय साध्य करणार? पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल