Jalna news: राज्यात सध्या मराठा - ओबीसी आरक्षण (Maratha-OBC reservation) प्रश्न तापल्याचे पाहायला मिळत असून दररोज मनोज जरांगे (manoj jarange) आणि सत्ताधारी विरोधकांसह ओबीसी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत.आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलक आमनेसामने येण्याची चर्चा सुरु असताना राजकीय घटनांना वेग आला आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांचे सहकारी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मनोज जोरांगेंवर जोरदार टीका केलीये. सरकारचा आधार आणि जरांगे यांचा जनाधार संपल्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले असा आरोप त्यांनी केलाय. पाचवी नापास मनोज जरांगे यांना संविधान आणि आरक्षण कळत नाही अशी टीका ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. जालना येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


सरकारचा आधार आणि जरांगे यांचा जनाधार संपला


ओबीसी आरक्षण आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारचा आधार आणि जरांगे यांचा जनाधार आता संपला आहे त्यामुळेच त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतल्याची  टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. 


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांची रसद


मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुख्यमंत्री रसद पूर्वत होते असा आरोप करत जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शिवराळ भाषा वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याचा देखील नवनाथ वाघमारे म्हणालेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सध्या सरकारला तारीख वाढवून दिली आहे. मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीविरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आल्यानंतर नवनाथ वाघमारे बोलत होते.


पाचवी नापास जरांगेला आरक्षण कळत नाही


पाचवी नापास जरंगेला आरक्षण आणि संविधान कळत नसल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी आज जालन्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली होती. या उपोषणास त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव स्थगिती दिल्याचे सांगितले. दरम्यान राजकीय वर्तुळातून उपोषण स्थितीवर मनोज जरांगेंवर जोरदार टीका होत असून ओबीसी आरक्षण आंदोलन नवनाथ वाघमारे यांनीही मनोज जरांगेंवर निशाणा साधला.


शिवराळ भाषा वापरून मराठा समाजाचा अपमान


ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जालन्यातून सुरू केल्यानंतर त्यांचे सहकारी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी मनोज जरांगेनी शिवराळ भाषा वापरून मराठा समाजाचा अपमान केला असल्याची टीका केली आहे.


हेही वाचा:


Prakash Ambedkar In Kolhapur : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध, विधानसभेला ओबीसीकडे मोर्चा वळवला; प्रकाश आंबडेकर काय काय म्हणाले?