Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची (Congress) आणि शरद पवार (Sharad Pawar)  यांची सत्तेपासून पैसा, अशी विचारधारणा आहे. आयुष्यभर त्यांनी असं राजकरण केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. जोपर्यंत इनपुट नसेल, तोपर्यंत अमितभाई बोलत नाहीत. त्यांच्यावर टिका म्हणजे सूर्याला दिवा दाखवन्यासारखं असल्याचे बावनकुळे म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांना देशानं स्वीकारलं आहे. काँग्रेसच्या काळात शाह यांच्यावर आरोप लावले होते. न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चीट दिल्याचे बावनकुळे म्हणाले. . 


महाविकास आघाडीकडे 14 मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे हे पंधरावे 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख खोटारडे आहेत. गृहमंत्री होते, तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता. आता सांगतात की, माझ्यावर दबाव होता. त्यांचा सर्व खोटारडेपणा सूरु आहे. हा बिझनेस सुरू असल्याचे ते म्हटले. आज महाविकास आघाडीकडे 14 मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरे हे पंधरावे आहेत. पुढच्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आलाय. राज्यकीय नेत्यांनी गाठी भेटी घ्याया सुरुवात देखील केली आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते आकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहे. अशातच महाविका आघाडीची सत्ता आली तर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. विविध नावांची चर्चा सुरु आहे. यावर देखील बानकुळे यांनी टीका केली. दरम्यान, इंडिया आघाडीने खोटारडेपणा केला आहे. आमचे खासदार निवडून आले तर साडेआठ खटाखट खात्यात जमा करु. आज खासदार निवडून आलेत, बहिणी विचार करतायत पैसे कधी येणार? असा टोला बावनकुळेंनी इंडिया आघाडीला लगावला. राज्याला डब्बल इंजिनची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.


महाविकास आघाडीला मतं देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना बंद करणं


मोदी सरकारच्या लाभ विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर डबल इंजीन सरकार निवडून द्या, असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, डबल इंजीन सरकारचा उल्लेख करत या डबल सरकारमध्ये अजित पवार की एकनाथ शिंदेसोबत असणार, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यात बोलत होते. आज जनतेला कळलंय महाविकास आघाडीला मतं देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना बंद करणं, असेही ते म्हटले.


महत्वाच्या बातम्या:


Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नौटंकी अन् नाच्यासारखी पार्टी, त्यांना कधीच चांगले काही पटत नाही; भाजप प्रदेशाध्यक्षाची बोचरी टीका