Jalna news: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अमित शहांनी (Amit Shah) शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भ्रष्टाचारी सरदार तुम्ही आधीच गुजरातला घेऊन गेलात असं म्हणत महाविकास आघाडीला मोडण्यासाठी गुजरातहून इथे शरद पवारांवर टीका केल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'राज्यातील सर्वात भ्रष्ट राजकारणी '  या टीकेला जयंत पाटलांनी प्रतिउत्तर दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज त्यांनी पदाधिकाऱ्यांसह पक्षातील सदस्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक बूथ कमिटीवर नीट रचना करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या महासंमेलनात शरद पवारांवर राज्यातील सर्वात भ्रष्ट राजकारणी अशी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे.ते म्हणाले,दुसरे साहेब येऊन म्हणले शरद पवार हे सगळ्या भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. हे सगळे सरदार तुम्हाला इतके आवडले की तुम्ही ते तुमच्या सोबत घेऊन गेलात.'


भाजपच्या पायाखालची वाळू सरकली


भाजपने नुकत्याच घेतलेल्या महासंमेलनात काही नेते म्हणाले विधानसभेत यांना ठोका. जेव्हा डोकं थांबतं जेव्हा शब्दांचा वापर थांबतो तेव्हा माणूस गुद्दागुद्दीवर येतो. यावरूनच कळतंय यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असं जयंत पाटील म्हणाले


 लाडकी बायको योजना आणा


सध्या महाराष्ट्रात रोज सकाळी एक घोषणा होतेय.लाडकी बहीण लाडका भाऊ योजना त्यांनी आणल्या आहेत. आमचे एकच म्हणणे लाडकी बायको योजना आणा तिच्यावर का अन्याय असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारची खिल्ली उडवली. तिजोरीत कितीआर्थिक बळ आहे याचा हिशोब न करता पाहिजे त्या घोषणा दुर्दैवाने सुरू आहेत. असल्या फसव्या घोषणा दोन-तीन महिन्यात जोरात होणार असल्याचेही ते म्हणाले.


मागच्या नऊ वर्षात लाडकी बहीण आठवली नाही का?


आपल्या राज्यामध्ये महागाई वाढली महागाई वाढली एवढी वाढली की आमच्या माऊलीला घर चालवणं मुश्किल झालं होतं. ते दहा वर्षात ज्यांनी दहा वर्षातज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्यांना नऊ वर्षात लाडके बहीण योजना आठवली नाही का ? असा सवाल जयंत पाटलांनी केला.पण लोकसभा झाल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर या योजना का आठवायला लागल्या असा सवालही त्यांनी सरकारला केला.


आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होणार असून महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत कारस्थान होणार असे सांगत कोणीही मनात संभ्रम बाळगू नका असा आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.