चूक झाली, पुन्हा भाजपसोबत जाणे हा आमचा मूर्खपणा: नितीश कुमार
Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत.
Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत. दरम्यान, जेडीयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (2017 मध्ये) भाजपसोबत जाणे ही चूक असल्याचे म्हटले असून हा आमचा मूर्खपणा होता, असं ते म्हणाले आहेत.
नितीश कुमार म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी दोन नावे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण जेव्हा आम्ही दिल्लीत पोहोचलो तेव्हा फक्त एकच नाव मागण्यात आलं. जेडीयूच्या कोट्यातून केंद्रात चार मंत्री असावेत, अशी आमची इच्छा असल्याने आम्ही ते मान्य केले नाही.
आरसीपी सिंहचे नाव न घेता टीका
जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांचे नाव न घेता मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मी जेव्हा केंद्रीय रेल्वे मंत्री झालो तेव्हा मी त्यांना माझे खाजगी सचिव केले होते. त्यांना नालंदामधून निवडणूक लढवायची होती. पण आम्ही त्यांना तसे करू नका असे सांगितले.
'कधीही तडजोड करणार नाही'
जोपर्यंत आमचा पक्ष आहे तोपर्यंत आम्ही या लोकांशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी घोषणा नितीश कुमार यांनी केली. ते म्हणाले, या लोकांना फक्त हिंदू-मुस्लिम अशी फूट पाडून राज्य करायचे आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीही आरएसएसचे ऐकले नाही आणि यापूर्वी केंद्र सरकारचे मंत्री कार्यक्रमाला गेल्यावर त्यांचे नाव घेत होते. परंतु आता ते हे नाव घेणे विसरले आहेत. सध्याचे केंद्रीय मंत्री केवळ पक्षाचीच नव्हे तर स्वत:ची चर्चा करतात.
जदयू राष्ट्रीय परिषद की बैठक को संबोधित करते हुए पार्टी के सर्वमान्य नेता माo मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार जी ने कहा कि आज केंद्र में बैठे लोग श्रद्धेय अटल जी का नाम भी नहीं लेते हैं, उनके काम तक की चर्चा नहीं करते। श्रद्धेय अटल जी सहयोगी दलों की बात सुनते और मानते थे। ...1/3 pic.twitter.com/DcmroQwM7e
— Janata Dal (United) (@Jduonline) September 4, 2022
'बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या'
बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, असे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतील केंद्रातून पैसा आला तर बिहारने स्वबळावर प्रगती केली. या लोकांनाही आमच्या सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे होते. पण आम्ही तसे होऊ दिले नाही.