India Africa Together: भारत अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाविरुद्ध लढण्याचे समर्थन करतो. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S jaishankar) म्हणाले की, भारत आता आफ्रिकन देशांसोबत मिळून कट्टरतावादी आणि दहशतवाद्यांशी लढत आहे. ते म्हणाले की, लवकरच संरक्षण मंत्री स्तरावरही मोठी बैठक होऊ शकते. जयशंकर म्हणाले की, युक्रेनचे संकट आणि जगभरातील कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी आफ्रिकन देश आणि भारत यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले, आफ्रिकेच्या पूर्व किनार्याशी भारताचे संबंध अतिशय मजबूत आहेत. आफ्रिकन देशातील वाढत्या कट्टरतावाद आणि दहशतवादाबद्दलही आम्ही गंभीर आहोत.
दरम्यान, 2020 मध्ये पहिले भारत-आफ्रिका संरक्षण मंत्री कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले होते. मार्चमध्ये दुसऱ्यांदा संरक्षण मंत्र्यांची परिषद होणार होती, प्रतिकूल परिस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. हा कार्यक्रम लवकरच होईल, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नायजेरिया, इथिओपिया, टांझानिया यांच्याशी संरक्षण करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याशिवाय बोट्सवाना, लेसोटो, झांबिया, युगांडा, नामिबिया आणि टांझानियासोबत सागरी सुरक्षा करार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तेसेच भारतीय लष्करी प्रशिक्षण संघांनी बोट्सवाना, लेसोथो, झांबिया, युगांडा, नामिबिया, टांझानिया, मॉरिशस आणि सेशेल्स येथे सैन्यासोबत काम केले आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, दहशतवाद, ड्रग्ज आणि अशा अनेक समस्या आफ्रिकन देश आणि भारतासाठी समान आहेत. त्यांचा एकत्रितपणे सामना करावा लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Karnataka Anti-Conversion Bill: कर्नाटकच्या राज्यपालांनी धर्मांतरविरोधी अध्यादेश केला मंजूर, जाणून घ्या काय आहे तरतूद
सामान्यांच्या खिशाला भार, मात्र सरकार कंपनी मालामाल; पेट्रोल-डिझेलच्या वाढीव किमतींमध्ये इंडियन ऑइलने कमावला विक्रमी नफा
Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही