Indian Oil Profit: पेट्रोलियम उत्पादनात देशातील आघाडीची सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी नफा कमावला आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीने 24,184 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे लोक त्रस्त झाले असून, दर कमी होण्याची वाट पाहत असताना ही आकडेवारी समोर आली आहे.
इंडियन ऑइलने 31 मार्च रोजी संपलेल्या शेवटच्या आर्थिक वर्ष 2021-22 चे उत्पन्न विवरण सादर केले आहे. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये कंपनीने एकूण महसूल आणि नफ्याच्या बाबतीत विक्रम केला आहे. या वर्षी कंपनीला एकूण 7,28,460 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो मागील वर्षी (2020-21) 5,14,890 कोटी रुपये होता.
इंडियन ऑइलला किती झाला नफा?
कंपनीने नफ्याच्या बाबतीतही विक्रम केला आहे. 2021-22 मध्ये कंपनीचा एकूण नफा 24,184 कोटी रुपये होता, जो आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. 2020-21 मध्ये कंपनीला एकूण 21,836 कोटी रुपयांचा नफा झाला होता. म्हणजेच या वर्षी सुमारे 2300 कोटी रुपयांचा अधिक नफा झाला आहे. तथापि, 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीच्या (जानेवारी-मार्च) तुलनेत 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत महसुलात वाढ होऊनही, कंपनीचा नफा कमी झाला.
पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून सरकार नफा कमावत आहे, विरोधकांचा आरोप
पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून सरकार नफा कमावत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने लिटरमागे 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. अशा स्थितीत ही आकडेवारी विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करण्याची आणखी एक संधी देणारी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Karnataka Anti-Conversion Bill: कर्नाटकच्या राज्यपालांनी धर्मांतरविरोधी अध्यादेश केला मंजूर, जाणून घ्या काय आहे तरतूद
सामान्यांच्या खिशाला भार, मात्र सरकार कंपनी मालामाल; पेट्रोल-डिझेलच्या वाढीव किमतींमध्ये इंडियन ऑइलने कमावला विक्रमी नफा