Election 2024 : एमआयएम (MIM) नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्याकडे देखील आपण मुंबईत लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं जलील यांनी सांगितलं आहे. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये मुंबईमधील एमआयएम कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
इम्तियाज जलील मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता
संभाजीनगर मधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला, तरी तो निवडून येईल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या एमआयएम कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील एमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही इम्तियाज जलील यांना मुंबईतून लढवावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
'अशोक चव्हाणांसारखे लोक आरएसएससी संबंधित'
इम्तिताज जलील यांनी एबीपी माझासोबत बातचीत करताना सांगितलं की, जे लोक आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचं बोट दाखवत होते, ते आज भाजपसोबत गेले आहेत. सुरुवातीपासून अशोक चव्हाणांसारखे लोक आरएसएससी संबंधित आहेत, फक्त सेक्युलरीझमचा बुरखा ओढून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करत आहेत आणि खेळ खेळत होते.
'छ. संभाजीनगरमध्ये कोणताही उमेदवार निवडून येईल'
छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही कोणताही उमेदवार उभा केला तरी, तो निवडून येईल. त्यामुळे सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एमआयएम पक्ष इतर ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक झाली. 18 फेब्रुवारीला ओवेसी यांची अकोल्यात सभा आहेत, त्यावेळ मतदार संघाबाबत स्पष्ट निर्णय होईल.
मुंबईमध्ये चार लोक मतदार संघावर MIMचं लक्ष
मुंबईमध्ये चार लोक मतदार संघावर एमआयएमचं लक्ष आहे. राज्यात मालेगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, विदर्भातील दोन मतदारसंघ, मराठवाडा आणि मुंबईतून AIMIM लढण्याची तयारी करत आहेत. मुंबईतील मोठे-मोठे नेते सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये केले आहेत, त्यामुळे मुंबईत पक्षाचा विस्तार करत मुंबईचा खासदार होण्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली आहे.
दहापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार
एमआयएम महाराष्ट्रातून दहापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभा करणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे मालेगाव यासह दहा पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात एमआयएम निवडणूक लढणार असल्याची माहिती एमआयएम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : इम्तियाज जलील मुंबईतून निवडणूक लढवणार?
महत्त्वाच्या इतर बातम्या :