Ashok Chavan Interview : काँग्रेलला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या क्षमतेवर भाष्य केलंय. पक्ष सोडताच अशोक चव्हाणांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलय. काँग्रेसमध्ये ना ताळमेळ आहे ना जिंकण्याची जिद्द आहे. वरिष्ठांमध्येच समन्वयाचा आभाव आहे, असे भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले आहेत. अशोक चव्हाण यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. 


काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते


अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते. पण कधीतरी हा निर्णय घ्यावाच लागणार होता. कारण निवडणूक ही युद्धासारखी असते. त्यासाठी तयारी करावी लागते. जी काँग्रेसमध्ये सध्यातरी दिसत नाही. काँग्रेस सोडताना मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो मी हा निर्णय का घेत आहे? हेही सांगितलं, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.


'मी भविष्याकडे पाहतोय'


पक्षाने मला भरभरून दिलं निश्चित पण मी ही पक्षासाठी खूप काही केलंय. 82 आमदार निवडून आणले, सत्ता आणली पण आजच्या नेतृत्वात निवडणूक जिंकण्याचं क्षमता नाही. बऱ्याच वेळेला पक्ष श्रेष्ठींना सांगितलं पण काही झालं नाही. नाना पटोलेंचा राजनीमा मी कधी ही मागितला नाही. भूतकाळात काय झालं कोणी काय केलं यात मला आता जायचं नाही.
मी भविष्याकडे पाहतोय, असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. 


कधीही पाठीत खंजीर खूपसला नाही ; अशोक चव्हाण 


पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन चूक केली. जर त्यांनी राजीनामा दिला नसती तर आज वेगळच चित्र असतं. पण पक्षाने काही कारवाई केली नाही. माझ्यावर झालेले आरोप चूकीचे मी पक्षाशी कधीच बेईमानी नाही केली. कधीही पाठीत खंजीर खूपसला नाही. मी मतदानाला का नाही पोहोचलो या बद्दल माझी भूमिका स्पष्ट केली. चंद्रकांत हांडोरे यांच्या पराभवात माझी कोणती ही भूमिका नाही. किती आमदार काँग्रेस सोडतील याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मोठ्या प्रमाणात आमदार नाराज आहेत, त्यांच्यात चलबिचल आहे. ते काय निर्णय घेतील माहित नाही.आदर्श प्रकरणात कोर्टाने निकाल आमच्या बाजूने दिला आहे. माझ्यावर कोणत्याही तपास यंत्रणेचा दबाव नव्हता.  माझ्या भविष्याचे विचार करतच हा निर्णय घेतला आहे, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : नितीश कुमार आले,मग उद्धव ठाकरे आले तर युती करणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाही!