एक्स्प्लोर

'आरएसएस-भाजप किती काळ जनतेची दिशाभूल करणार?', हंगर इंडेक्स रँकिंगवर राहुल गांधी यांचं वक्तव्य

Rahul Gandhi On Global Hunger Index: नुकताच ग्लोबल हंगर इंडेक्स-2022 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर भारत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला लक्ष केलं आहे.

Rahul Gandhi On Global Hunger Index: नुकताच ग्लोबल हंगर इंडेक्स-2022 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर भारत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला लक्ष केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट  करून लिहिले की, "भूक आणि कुपोषणात भारत 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आहे. आता पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री म्हणतील की भारतात उपासमारी वाढत नसून इतर देशांमध्ये लोकांना भूकच लागत नाही."

राहुल गांधी यांनी पुढे लिहिले आहे की, "आरएसएस-भाजप किती दिवस जनतेची दिशाभूल करून भारताला कमकुवत करण्याचे काम जाणार आहेत?" राहुल गांधींसोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम आणि इतर काँग्रेस नेत्यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ''मोदीजी, दुसरे काही निमित्त उरले आहे का?'' ते म्हणाले की, ''उपासमारी निर्देशांकात भारत पुन्हा खाली घसरला आहे. भाजप वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.''

केंद्र सरकारने हा अहवाल फेटाळला

असं असलं तर भारत सरकारने हा अहवाल फेटाळला आहे. शनिवारी केंद्र सरकारने सांगितले की, हा अहवाल ग्राउंड रिअॅलिटीपेक्षा वेगळा आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात सरकारने केलेल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं आहे. या माध्यमातून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच दरवर्षी खोटी माहिती देणे हे ग्लोबल हंगर इंडेक्सचे वैशिष्ट्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी: 

जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची 107 व्या स्थानी घसरण, पाकिस्तान-बांग्लादेशही भारताच्या पुढे 

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget