Vedanta Foxconn: एकामागून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. यावरूनच आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे. तब्बल 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय प्रयत्न केले याची संपूर्ण टाइमलाईन आदित्य ठाकरे यांनी सांगितली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काय प्रयत्न केला. याची संपूर्ण टाइमलाईन जाणून घेऊ. 


टाइमलाईन 


15, डिसेंबर 2021: भारत सरकारने 76,000 कोटींची सबसिडी देत परिव्ययासह आपले सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले धोरण जाहीर केले.


5 जानेवारी 2022: वेदांतने महाराष्ट्र सरकारला एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सादर केला. वेदांताच्या बाजार अभ्यासानुसार ते गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणालाही पाठवण्यात आले होते.


11 जानेवारी 2022: महाराष्ट्र सरकारने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला वेदांतकडून स्पष्टीकरणे आणि इनपुट्स मिळविण्यासाठी प्रश्नावलीसह कराराला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता देऊन प्रतिसाद दिला.


16 जानेवारी 2022: वेदांतने स्पष्टीकरणांसह प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्र सरकारला 19 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.


28 जानेवारी 2022 : वेदांतकडून सबमिट केलेल्या ईओएलवर मुख्य प्रश्न आणि स्पष्टीकरणे. 


1 फेब्रुवारी 2022: महाराष्ट्र सरकार कडून प्रतिसाद सबमिट केला.


19 फेब्रुवारी 2022: 24 फेब्रुवारी 2022 रोजी तळेगावला वेदांत टीमच्या साइट विझिटची पुष्टी झाली.


24 फेब्रुवारी 2022: साइट विझिट.


5 मार्च, 2022 नंतर: संभाव्य गुंतवणूकदारासोबत शेअर केला साइट विझिटचा डेटा.


3 मे 2022: वेदांताच्या टेक्निकल भागीदार फॉक्सकॉनने साइटला भेट दिली.


5 मे, 2022: वेदांतने दुसरे एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टचा अर्ज महाराष्ट्र सरकारला दिला.


6 मे 2022: उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत वेदांत फॉक्सकॉनची बैठक झाली.


14 मे 2022: वेदांतने संपूर्ण प्रकल्पाच्या तपशीलवार कामकाजासह आपला गुंतवणूक अर्ज महाराष्ट्र सरकारकडे पाठवला. महाराष्ट्र सरकारकडून वचनबद्धतेची विनंती केली.


24 मे 2022: राज्य सरकारच्या शिष्टमंडळाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची भेट घेतली आणि प्रकल्पावर चर्चा केली. 


13 जून 2022 : महाराष्ट्र सरकारद्वारे शेअर केलेले तात्पुरते प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा पॅकेज, HPC आणि कॅबिनेट मंजुरीसाठी प्रलंबित.


24 जून 2022 : फॉक्सकॉनचे चेअरमन आणि सुभाष देसाई यांची दिल्लीत भेट झाली.


सरकारमध्ये बदल


14 आणि 15 जुलै 2022 : वेदांत- फॉक्सकॉनच्या चेअरमनला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण देणारे आणि पुढील पावले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र.


15 जुलै 2022 : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने अंदाजे भांडवली अनुदान आणि मुद्रांक शुल्क सूट संदर्भात प्रस्तावित प्रोत्साहनांना मंजुरी दिली. इतर प्रोत्साहनांसह 35,000 कोटी.


26 जुलै 2022 : ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर आकर्ष हेब्बर यांच्या नेतृत्वाखाली वेदांत आणि फॉक्सकॉनच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.


27 ऑगस्ट 2022: डीसीएम आणि अनिल अग्रवाल यांची भेट. 


5 सप्टेंबर 2022- औपचारिक निमंत्रण.