Shiv Sena-Sambhaji Brigade Alliance : ज्या संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) कधीकाळी हिंदू धर्मापासून वेगळे होत नव्या शिवधर्माची स्थापना केल्याचं जाहीर केलं होतं, त्या संभाजी ब्रिगेडची आता कट्टर हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेसोबत (Shiv Sena) युती होत आहे. मात्र संभाजी ब्रिगेडच्या प्रवासातील हा काही एकमेव विरोधाभास नाही. कारण संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी याच कालखंडात भारतीय जनता पक्षाच्या तीनवेळा आमदार देखील राहिल्या आहेत.


पाहुयात संभाजी ब्रिगेडच्या या प्रवासाची कहाणी. 


* मराठा सेवा संघाची युवक आघाडी म्हणून 1997 मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. 


* याच काळात मराठा सेवा संघाकडून म्हणजे 1995 मध्ये शिवराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र त्याला 20 वर्षात अपेक्षित यश मिळालं नाही . 


* 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करुन संभाजी ब्रिगेड प्रकाशझोतात आली. वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर संस्थेने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ल्ला केला होता. 


* भांडारकर संस्था आणि त्या संस्थेतील संस्कृत विभागाचे प्रमुख श्रीकांत बहुलकर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या आधी असाच आरोप शिवसेनेने केला होता आणि बहुलकरांना स्थानिक शिवसैनिकांनी काळं फासलं. मात्र त्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली. त्यावेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरेंनी पूण येऊन बहुलकरांची माफी मागितली. संभाजी ब्रिगेडने त्यानंतर भांडारकरांच्या मुद्दा हातात घेतला आणि संस्थेवर हल्ला केला . त्यानंतर शिवसेना आणि संभाजी ब्रगेड एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.


* 2012 साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली. त्यावेळी देखील संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत संघर्ष उभा राहिला. त्यावेळचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पुढाकाराने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.
 
* देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भात-शिवसेना युतीने बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता . मात्र संभाजी ब्रिगेडने या निर्णयाच्या विरोधात आंदोलने केली.
 
* संभाजी ब्रिगेडकडून 1998 रोजी सनातन हिंदू धर्मापासून वेगळं होत शिवधर्माची स्थापना करण्यात आली. दहा वर्ष या धर्माचा प्रचार केल्यानंतर 2008 साली या धर्माचा प्रकटदिन सोहळा पुरोयषोत्तम खेडेकरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
 
* मात्र याच काळात खेडेकरांच्या पत्नी रेखा खेडेकर या कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या भाजपच्या आमदार होत्या.
 
* 2016 साली संभाजी ब्रिगेड फुटली आणि प्रवीण गायकवाड पुरुषोत्तम खेडेकरांपासून वेगळे झाले . प्राचीन गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचे काम करतात.
 
* 2018 साली संभाजी ब्रिगेडची एक राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली.
 
* संभाजी ब्रिगेडने त्यानंतर निवडणूक लढवून पहिल्या पण यश मिळाले नाही.
 
* दरम्यान रेखा खेडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
* सध्या रेखा खेडेकर या पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं.


Shiv Sena Sambhaji Brigade Uddhav Thackeray Full PC : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र : ABP Majha



संबंधित बातमी


मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा, ठाकरे म्हणाले...