Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. गुजरातमधील गांधीनगर (Gandhinagar) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी पंतप्रधान मोदींसह त्यांच्या भावांनी हिराबेन यांना अखेरचा निरोप दिला.


पंतप्रधान मोदींचा आईच्या पार्थिवाला खांदा




हिरा बा यांचं आज (30 डिसेंबर) पहाटे साडेतीन वाजता निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांची अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांचे पार्थिव पीएम मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं. जिथे पंतप्रधान मोदी पोहोचले आणि त्यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही आईच्या पार्थिवाला खांदा दिला. 


आईमध्ये नेहमीच त्रिमूर्तीचा भास व्हायचा : नरेंद्र मोदी


तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन आई हिराबेन यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं आणि त्या अनंतात विलीन झाल्या. परंतु पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील आजच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील. या कार्यक्रमांमध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय गंगा परिषदेची बैठक यांचा समावेश आहे. मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु आईच्या निधनानंतर त्यांनी या कार्यक्रमांना ऑनलाईन सामील होण्याचा निर्णय घेतला.


संबंधित बातमी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास