Harshvardhan Patil on Ajit Pawar : अजितदादांना सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांना भेटा, मग आपण माझ्या घरी जेवण करू : हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil on Ajit Pawar, Indapur : अजित पवारांनी विचारणा केली मला भेटायला यायचं आहे. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला भेटायच्या आधी माझ्या लोकांशी बोला
![Harshvardhan Patil on Ajit Pawar : अजितदादांना सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांना भेटा, मग आपण माझ्या घरी जेवण करू : हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil on Ajit Pawar i Told Ajit pawar, meet my workers, then we will have dinner at my house Harshvardhan Patil says in indapur Maharashtra Politics Marathi news Harshvardhan Patil on Ajit Pawar : अजितदादांना सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांना भेटा, मग आपण माझ्या घरी जेवण करू : हर्षवर्धन पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/6b8c8eabc35627fdcbf987e5de1df7bd1713542415052924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Harshvardhan Patil on Ajit Pawar, Indapur : "अजित पवारांनी विचारणा केली मला भेटायला यायचं आहे. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला भेटायच्या आधी माझ्या लोकांशी बोला. ते झाल्यानंतर माझ्या घरी जेवायला या जेवन करु.", असं माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. ते इंदापुरात बोलत होते.
महायुतीचे काम करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला
हर्षवर्धन पाटील म्हणाले, उत्साहाच्या वातावरणात आज मतदान झालं. मोदींनी जी गॅरंटी घेतली त्या आधारे लोकांनी मतदान केलं. चांगलं मतदान लोकांनी केलं आणि हा कौल महायुतीच्या बाजूने असेल. आमच्या विरोधकांच्या मनात नाराजी असेल परंतु मतदारांच्या मनात नाराजी नाही. महायुतीचे काम करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. सगळ्या चर्चा आमच्या ज्या ठरल्या होत्या त्या झाल्या आहेत. आमचे काही प्रश्न आहेत ते आज आम्ही अजित पवारांकडे मांडणार आहोत. ग्राऊंडवर कार्य करणारी टीम इथे बसली आहे.
सुनेत्रा पवारांच्या फॉर्मवर सूचक म्हणून माझी सही आहे
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आम्हाला धमकावले जात आहे. अजुनही काही प्रमाणात धमकावले जात आहे. सुनेत्रा पवारांच्या फॉर्मवर सूचक म्हणून माझी सही आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे, आमची बऱ्याच बाजूनी आमची चर्चा झाली. आम्ही आता महायुतीचे काम करतो आहोत. भविष्यात त्यांना आमचं काम करावं लागेल. दादा आज 30 वर्षातील पहिला योग आहे. का आलात याची देखील चर्चा करावी लागेल. दीड लाख मते आमच्या कार्यकर्त्यांकडे आहेत. तुम्ही येणार आहेत हे कार्यकत्यांना कसे सांगायचे? हा प्रश्न होता.
सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे
आपला संघर्ष झाला पण राजकीय होता पण वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव आमचा आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. स्पष्ट भूमिका असली की अडचणी कमी होतात नसली तर अडचणी वाढतात. सुनेत्रा पवार खासदार सुनेत्रा पवार असल्या पाहिजेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)