Govinda Ahuja join Shinde's Shivsena : "मी आदरणीय शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो. मी आज पक्षप्रवेश केलाय. मी 2004 ते 2009 सुरुवातीला राजकारणात होतो. मात्र, 14 वर्षांच्या वनवासानंतर सुरुवात होत आहे. रामराज्य जिथे आहे, त्या पक्षात आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यामुळे पक्षात आलो आहे. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडता यावी, यासाठी मी प्रार्थना करतो", असं अभिनेता गोविंदा अहुजा म्हणाला. गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी तो बोलत होता. 


 तुम्ही दिलेली जबाबदारी मी जबाबदारीने पार पाडेन


गोविंदा म्हणाला, तुमचे धन्यवाद तर देतोच मात्र, तुम्ही दिलेली जबाबदारी मी जबाबदारीने पार पाडेन. कला आणि संस्कृतीची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर मी स्वत:ला धन्य समजेन. मी विरारपासून बाहेर पडलो आणि आज संपूर्ण जगात प्रसिद्ध झालो. जगात झगमगणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्राची भूमी महत्वपूर्ण आहे. संतांची भूमी आहे. आपल्या देशात चित्रपट असो किंवा संस्कृती आहे, ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मला वाटतय 10 वर्षांपूर्वी दक्षिण मध्यसाठी भाषण केले होते. आता मी भाषण देतोय ती सत्य व्हावी, असंही गोविंदाने नमूद केलं. आता मुंबई  फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्या कृपा होती, असंही गोविंदाने स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


गोविंदा आला रे आला... अभिनेता गोविंदा अहुजा शिंदेंच्या शिवसेनेत दाखल!