एक्स्प्लोर

Govinda Net Worth : अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?

Govinda Net Worth : मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीची दूर असून ही गोविंदा चांगली कमाई करत आहे. त्याचे उत्पन्न किती?

Govinda Net Worth :  बॉलिवूड (Bollywood) आणि राजकारणाचा (Politics) संबंध फार जुना आहे. अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली छाप सोडली. तर, काहींना राजकारणातील वातावरण मानवले नाही. बॉलिवूडमधला 'हिरो नंबर 1' असलेल्या गोविंदाचा राजकीय प्रवेशही असाच अचानक झाला होता. जवळपास 14 वर्षानंतर आता गोविंदा (Govinda) पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात उतरला आहे. 

गोविंदाने राजकारणात येण्यासाठी आपले बॉलिवूड करिअर बाजूला ठेवले होते. खासदार झाल्यानंतर त्याने   2006 च्या सुमारास सिनेसृष्टीत पुनरागमन केले होते. मात्र, मागील काही वर्षात गोविंदाची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरिही गोविंदा दरवर्षी करोडोंची कमाई करतो. 

'इल्झाम' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या गोविंदाने आपल्या कसदार अभिनयाने, दमदार नृत्याने आणि कॉमेडीच्या टायमिंगने  आपल्या चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. मागील काही वर्षात गोविंदाचे स्टारडम कमी झाले.पण,  एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपटांची रांग होती. गोविंदा त्या काळात भरपूर कमाई करत असे. अनेक ब्रँड एंडोर्समेंटमधूनही त्याने भरपूर कमाई केली आहे. 

गोविंदाचाही आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याशिवाय त्यांचा जुहूमध्ये एक बंगला आणि मड आयलंडमध्ये एक बंगला आहे. याशिवाय, त्याने अनेक रिअल इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते. गोविंदाचे कार कलेक्शनही खूपच अप्रतिम आहे. त्याच्याकडे फोर्ड एंडेव्हर आणि मित्सुबिशी लान्सरसह इतर अनेक लक्झरी कार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदांच्या उत्पन्नाचा स्रोत हा ब्रँड एंडोर्समेंट आहे. यातून चांगली कमाई होते. गोविंदा यातून दरवर्षी 16 कोटी रुपये कमावतो. गोविंदाचा काही व्यवसाय असून त्यातून तो करोडोंची कमाई करतो, अशीही चर्चा आहे. मात्र, त्याच्या व्यवसायाबाबत माध्यमांमध्ये फारशी माहिती नाही. पण तो अनेक रिॲलिटी शोमध्ये पाहुणा म्हणून दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची संपत्ती ही 170 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते.  

2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी 

अभिनेता गोविंदा याने मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणुकीत उत्तर मुंबई  मतदारसंघात विरारपर्यंतचा भाग येत असे. गोविंदा याने राम नाईक यांचा जवळपास 50 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget