Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये (Maha Vikas Aghadi) चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खिल्ली  उडवली आहे. संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्याने लोक संभ्रमात आहेत, तर लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने  वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. धनगर आरक्षणाचा मुद्द्या टेक्निकल विषय, तो दुरुस्त करू आणि आरक्षणाचा विषय  मार्गी लावू, अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.


संजयकाकाच्या विरोधात नेमका उमेदवार कोण? 


सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर  एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेला आहोत. मात्र, अजून देखील  भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे म्हणत सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये चाललेल्या राजकारणाची आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे. 


सांगली मतदारसंघाबाबत मविआचा तिढा कायम


मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित  इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थित लावत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी पडळकर माध्यमाशी बोलत होते. राज्यभर आणि देशभर लोकसभेचे वातावरण तयार झालेले आहे. सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा खासदार  संजय काका पाटील यांना मिळालेली आहे. नुकतेच मंत्री उदय सामंत  यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली. आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लोकसभेच्या निवडणूकीत  रंग येईल. मात्र, संजयकाकाच्या विरोधातला नेमका पैलवान कोण हे फायनल झाले नाही, असं पडळकर यांनी म्हटलंय.


गोपीचंद पडळकरांनी उडवली मविआची खिल्ली


धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळे लोकसभा  निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही.  धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्या हा टेक्निकल  विषय बनला आहे. आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित  इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थित लावत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी पडळकर माध्यमाशी बोलत होते.


धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू


आरक्षणाच्या बाबतीत आमचं जे म्हणणं होतं, ते बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. परंतु आमच्याच काही लोकांनी धनगराच्या दाखले काढल्यामुळे काही गोंधळ निर्माण झाला, त्याची व्हॅलिडीटी रद्द व्हावी. असा आमचा प्रयत्न झाला. पण, ते अधिकारी एक मुद्दामहून रजेवर गेले, त्याला असे अनेक अंग आहेत तर ते सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू, असं पडळकर म्हणालेत.